सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताला सुरुवात: परिसर भाविकांनी गेला फुल्लुन: शवप्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ पासून
By पूजा प्रभूगावकर | Published: December 4, 2023 04:33 PM2023-12-04T16:33:00+5:302023-12-04T16:34:07+5:30
फेस्तानिमित झालेल्या मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव तसेच मंत्री व आमदार उपस्थित होते.
पणजी: जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताला सोमवारी सुरुवात झाली आहे. यावेळी बॅसिलिका ऑफ बॉम जिजस चर्च परिसर अक्षर:शा भाविक तसेच पर्यटकांनी फुल्लुन गेला होता.फेस्तानिमित झालेल्या मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव तसेच मंत्री व आमदार उपस्थित होते.
यावेळी गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी नेर्रांव यांनी पुढील वर्षी होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या शवप्रदर्शनाच्या तारखा जाहीर केला. शवप्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या काळात होईल असे सांगितले.
जुने गोवे येथील फेस्ता निमित २५ नोव्हेंबर पासून नोव्हेंनांना सुरुवात झाली होती. नऊ दिवसांनी फेस्ताला सुरुवात झाली.फेस्तानिमित कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला आहे. परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी मनोरेही उभारले आहेत. चर्च परिसरात येणाऱ्या भाविकांची तपासणी करुनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ओळखपत्र सक्तीचे आहे. या फेस्तासाठी केवळ गोव्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथून भाविक मोठया संख्येने दाखल झाले आहेत.