गोवा मॉडेल दिल्लीवर भारी! आयव्हीएफ उपचार सेवेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 09:34 AM2023-09-02T09:34:22+5:302023-09-02T09:36:17+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ मोफत उपचार पद्धतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

start of ivf treatment service in goa | गोवा मॉडेल दिल्लीवर भारी! आयव्हीएफ उपचार सेवेला सुरुवात

गोवा मॉडेल दिल्लीवर भारी! आयव्हीएफ उपचार सेवेला सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रात क्रांती होत आहे. पुढील ६ महिन्यांत गोवा मॉडेल देशभर प्रसिद्ध होणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

शुक्रवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ मोफत उपचार पद्धतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर वरिष्ठ डॉक्टरांसह अपत्य नसलेली जोडप्यांची उपस्थित होती.

मंत्री राणे म्हणाले, काही पक्षाचे राजकारणी गोव्यात येऊन दिल्ली मॉडेलचे राजकारण करत आहेत. पण गोवा हे दिल्लीपेक्षा आरोग्य क्षेत्रात आघाडीवर आहे. आयव्हीएफ उपचार मोफत देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. फक्त देशातच नाही तर जगभरात हा उपचार कुठेच मोफत दिला जात नाही. या उपचारासाठी लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत; पण गोवा सरकारने केंद्राच्या सहकार्याने ही उपचार पद्धतीत सुरू केली आहे.

'हेल्पलाईन' देणार

ज्या जोडप्यांना मुले नाहीत अशा जोडप्यांच्या चेहयावर आता हास्य फुलणार आहे. आज अनेक जोडपी या ठिकाणी सरकारच्या आरोग्य क्षेत्रावर विश्वास ठेवून आली आहेत. त्यांना नक्कीच या उपचाराचा लाभ होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत. तसेच या विषयी जास्त माहिती जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांकही दिला जाणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

 

Web Title: start of ivf treatment service in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.