जानेवारीपासून जुने गोवे मास्टरप्लानची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु; सेव्ह ओल्डगोवाचा सरकारला इशारा

By पूजा प्रभूगावकर | Published: December 2, 2023 01:53 PM2023-12-02T13:53:52+5:302023-12-02T14:17:24+5:30

डिसेंबर २०२४ मध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे शवप्रदर्शन होणार आहे.

Start the process of old Goa Masterplan from January, or face strong agitation; Save Oldgoa's warning to the government | जानेवारीपासून जुने गोवे मास्टरप्लानची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु; सेव्ह ओल्डगोवाचा सरकारला इशारा

जानेवारीपासून जुने गोवे मास्टरप्लानची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु; सेव्ह ओल्डगोवाचा सरकारला इशारा

पणजी: युनेस्कोकडून जागतीक वारसा म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या जुने गोवेचा मास्टरप्लान तयार करण्याची प्रक्रिया जानेवारी पासून सुरु करावा. अन्यथा आंदोलन करु असा सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन कमिटीने दिला आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे शवप्रदर्शन होणार आहे. त्यासाठी लाखो संख्येने भाविक जुने गोवेत दाखल होतील. त्यापूर्वी जुने गोवेचा मास्टरप्लान तयार करावा. त्याची प्रक्रिया जानेवारी २०२४ पासून सुरु करावी . तसे करताना स्थानिक पंचायत व जुने गोवेवासियांनी विश्वासात घ्यावे अशी मागणीही कमिटीने केली.

कमिटीचे सदस्य पीटर व्हिएगस म्हणाले, की जुने गोवेला युनेस्कोकडून जागतीक वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. मात्र मागणी करुनही अजूनही जुने गोवेचा मास्टर प्लान तयार झालेला नाही. तसेच प्रादेशिक आराखडयातही या वारसास्थळ परिसरात किती बफर झोन असावा हे नमूद केलेले नाही. २०१४ मध्ये झालेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या शवप्रदर्शनावेळी ४४ लाखांहून अधिक भाविकांनी जुने गोवेला भेट दिली होती. २०२४ मध्ये ही संख्या निश्चितच वाढेल. यामुळे पार्किंग समस्याही निर्माण होईल.या स्थितीत मास्टरप्लानही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Start the process of old Goa Masterplan from January, or face strong agitation; Save Oldgoa's warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा