राज्यांतर्गत कदंबही ‘एसी’

By admin | Published: September 11, 2015 01:59 AM2015-09-11T01:59:22+5:302015-09-11T01:59:36+5:30

पणजी : पणजी-मडगाव, पणजी-वास्को व मडगाव-वास्को अशा तीन मार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी कदंब वाहतूक महामंडळ मोठ्या एसी बसगाड्या सुरू करणार आहे.

In the state 'Kadambhi' AC | राज्यांतर्गत कदंबही ‘एसी’

राज्यांतर्गत कदंबही ‘एसी’

Next

पणजी : पणजी-मडगाव, पणजी-वास्को व मडगाव-वास्को अशा तीन मार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी कदंब वाहतूक महामंडळ मोठ्या एसी बसगाड्या सुरू करणार आहे. प्रत्येकी १०० प्रवाशांची या बसेस वाहतूक करू शकतील. या एसी बसेसमुळे तीन मार्गांवर कदंबचा प्रवास साधारणपणे २० टक्क्यांनी महागणार असल्याची माहिती मिळाली.
सध्या प्रति किलोमीटर कदंबकडून १ रुपया २० पैसे दर आकारला जातो. आपल्याला दीड रुपये तिकीट दर मिळावा, असा प्रस्ताव महामंडळाने सरकारकडे पाठवला आहे. या आधुनिक गाड्या चालविण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण चतुर्र्थीपूर्वी दिले जाणार आहे.
कदंब वाहतूक महामंडळाला सरकार निधी कमी पडू देणार नाही. महामंडळासाठी सरकारने १५० कोटींची तरतूद केली आहे. केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेखाली महामंडळास आणखी २२ बसगाड्या मिळतील व एकूण संख्या ५० होईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
कदंब महामंडळाच्या ताफ्यात या योजनेखाली गुरुवारी २८ बसगाड्या दाखल झाल्या. मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या उपस्थितीत गुरुवारी या बसगाड्यांचा शुभारंभ करण्यात आला. या २८ वगळता २ एसी मिनी बसगाड्यांचाही मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला. आंतरराज्य मार्गांवर आगामी काळात चार लक्झरी बसगाड्या सुरू केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
या वेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह कदंबचे चेअरमन कार्लुस आल्मेदा, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, आमदार नीलेश काब्राल, महापौर शुभम चोडणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कदंबला गेल्या वर्षी सरकारने ५२ कोटी रुपये दिले होते. यंदा दीडशे कोटींची तरतूद केली आहे. यात अनुदान, कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व अन्य खर्चाचा समावेश आहे. कदंबच्या चालक व कंडक्टरांनी जास्त जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रवाशांना स्वत:ची कारगाडी रस्त्यावर आणावी असे वाटू नये या हेतूने आम्ही एसी बसगाड्या रस्त्यावर आणत असल्याचे पार्सेकर यांनी नमूद केले. रात्री नऊ वाजल्यानंतरही राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहायला हवी, असे मत उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी व्यक्त केले.
या बसेस अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज असून सुरक्षित प्रवासाकरिता ओळखल्या जातील. बसचा दरवाजा स्वयंचलित (अ‍ॅटोमॅटिक) असून दरवाजा काही कारणाने उघडा राहिल्यास बस पुढे जाऊ शकणार नाही. अशा विविध यंत्रणा त्यात बसविल्या असल्याचे ‘कदंब’च्या सूत्रांनी स्पष्ट केले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: In the state 'Kadambhi' AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.