बीपीएस स्पोर्ट्स क्लबतर्फे २७ एप्रिलपासून राज्य मानांकन टेनिस स्पर्धा ; २१५ खेळाडूंनी केली नावनोंदणी
By समीर नाईक | Published: April 26, 2024 03:08 PM2024-04-26T15:08:35+5:302024-04-26T15:08:50+5:30
आयोजकांच्या म्हणण्यानुसार सहभागासाठी एकूण २१५ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. तसेच राज्यात पहिल्यांदाज १० वर्षाखालील श्रेणी देखील आयोजित केली आहे.
मडगावः येथील बीपीएस स्पोर्ट्स क्लब येथे दि. २७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या बाले बीपीएस ओपन २०२४ या राज्य मानांकन टेनिस स्पर्धेच्या पदापर्ण आवृत्तीत सहभागी होण्यासाठी २१५ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. सदर स्पर्धा मडगाव येथील प्रतिष्ठित बीपीएस स्पोर्ट्स क्लबने. रिसॉर्ट गोवा, गोवा राज्य टेनिस संघटना यांच्या सहाय्याने आयोजित करण्यात आली आहे. ५ मे पर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार सहभागासाठी एकूण २१५ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. तसेच राज्यात पहिल्यांदाज १० वर्षाखालील श्रेणी देखील आयोजित केली आहे. १० वर्षांखालील गटासाठी १२ स्पर्धकांनी नोंदणी केली असून त्यात नऊ मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. १४ वर्षाखालील गटासाठी ३३ सहभागींनी नोंदणी केली आहे, ज्यात २३ मुले आणि १० मुली आहेत. १८ वर्षाखालील गटात २२ मुले व सात मुलींनी नोंदणी केली आहे. मिश्र दुहेरी गटासाठी १७ जोड्यांनी नोंदणी केली आहे, तर पुरुष दुहेरी स्पर्धेसाठी २५ जोड्यांनी नोंदणी केली आहे. महिला आणि पुरुष एकेरी गटात अनुक्रमे १४ महिला टेनिसपटू आणि ४९ पुरुष टेनिसपटूंनी नोंदणी केली आहे.
तसेच ४५ पेक्षा अधिक अनुभवी एकेरी गटात १५ नोंदण्या प्राप्त झाल्या आहेत, तर ४५ पेक्षा अधिक अनुभवी दुहेरी गटात ८ जोडयांनी नोंदणी केली आहे. ९ खेळाडूंनी ५५ पेक्षा अधिक अनुभवी एकेरी स्पर्धेसाठी आणि ४ खेळाडूनी ५५ पेक्षा अधिक कोरी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे.