राज्याच्या पहिल्या पर्यटन संचालक ॲड.लिबिया लोबो सरदेसाई यांचा १०० वा वाढदिवस, पर्यटन खात्यातर्फे सत्कार
By समीर नाईक | Published: May 26, 2024 04:24 PM2024-05-26T16:24:33+5:302024-05-26T16:24:58+5:30
लिबिया लोबो या स्वातंत्र्य गोवा, दमण आणि दीवच्या पहिल्या पर्यटन संचालक होत्या. या अग्रगण्य भूमिकेत त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या सुधारणेसाठी काम केले.
पणजी: स्वातंत्र्यसैनिक आणि गोवा, दमण आणि दीवच्या पहिल्या पर्यटन संचालक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन खात्याच्या वतीने पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन खात्याचे विद्यमान संचालक सुनील अंचिपाका, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लिबिया लोबो या स्वातंत्र्य गोवा, दमण आणि दीवच्या पहिल्या पर्यटन संचालक होत्या. या अग्रगण्य भूमिकेत त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या सुधारणेसाठी काम केले.
हा सत्कार समारंभ लिबिया लोबोच्या चिरस्थायी वारशासाठी योग्य आदर आहे. हा त्यांचे पती पद्मश्री (दिवंगत) वामन सरदेसाई यांच्यासमवेत स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची निर्णायक भूमिकाचाच नव्हे तर पर्यटन खात्यातील त्यांच्या सहभागाचाही गौरव आहे.
अंगोलाचे राजदूत म्हणून नियुक्त झालेले आदरणीय पद्मश्री (दिवंगत) वामन सरदेसाई यांच्या पत्नी लिबिया लोबो यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नोव्हेंबर १९५५ ते २० डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्तीपर्यंत महत्त्वाची माहिती प्रसारित करणारे भूमिगत रेडिओ स्टेशन चालवून या जोडप्याने विलक्षण धैर्य आणि समर्पण दाखवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुक्ती चळवळीला अमूल्य पाठिंबा मिळाला, प्रतिकाराची भावना जिवंत ठेवली. जेव्हा गोवा स्वातंत्र्य झाला तेव्हा लिबिया लोबो सरदेसाई यांनी ‘गोवा अखेर मुक्त झाला आहे’ अशी घोषणा भारतीय हवाई दलाच्या विमानातून फिरून केली होती.
गोवा पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका, यांनी लिबिया लोबो सरदेसाई यांच्या आदरार्थी भावनेबद्दल आणि गोवा मुक्ती चळवळीतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल मनापासून कौतुक आणि आदर व्यक्त केला. तसेच त्यांची जीवनकथा हा एक ऐतिहासिक वारसा आहे, जो राज्यातील प्रत्येक व्यक्तीने जतन केला पाहिजे. विशेषत: तरुण पिढीने यातून प्रेरणा घ्यावी, असे अंचिपाका यांनी सांगितले.