एसटी आरक्षण हवे तर गटबाजी बंद करा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 10:42 AM2023-07-02T10:42:57+5:302023-07-02T10:46:35+5:30

दोन्ही गटांना एकत्र आणा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांना दिला.

stop factionalism if st reservation is desired bjp core committee meeting | एसटी आरक्षण हवे तर गटबाजी बंद करा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पडसाद

एसटी आरक्षण हवे तर गटबाजी बंद करा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पडसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अनुसूचित जमातींना (एसटी) जर विधानसभा मतदारसंघांचे आरक्षण लवकर हवे असेल तर एसटींमधील दोन गटांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या बैठकीत केले. दोन्ही गटांना एकत्र आणा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांना दिला.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल पणजीत झाली. पाऊण तास बैठक चालली. त्यावेळी एसटी आरक्षण विषयावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी जर एसटींना विधानसभेचे आरक्षण मिळाले तर भाजपसाठी ते उपयुक्त ठरेल, असा मुद्दा तवडकर यांनी मांडला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की एसटींमध्ये दोन गट असल्याने अडचण येत आहे. तुमचा एक गट आणि दुसरा गोविंद गावडे व प्रकाश वेळीप यांचा एक गट झालेला आहे. दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे मुख्यमंत्री बोलले.

त्यावर तवडकर यांनी आपल्या मनात कोणतीच गटबाजी नाही, असे सांगितले. गोविंद गावडे व प्रकाश वेळीप यांना आपण आपले विरोधक मानत नाही. मात्र मंत्री गोविंद हे माझ्या काणकोण मतदारसंघाला भेट देण्यापूर्वी मला कळवतदेखील नाहीत, असे तवडकर यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मी प्रियोळ मतदारसंघात गेलो तर अगोदरमंत्री गावडे यांना त्याची कल्पना देतो. गावडे मात्र एकटेच यापूर्वी काणकोणमध्ये आले व रवींद्र भवनच्या कामाची पाहणी करून गेले. मला काही फरक पडत नाही; पण गावडे स्वत:च असे वागतात, असे तवडकर बोलले...

तानावडेंचे नाव श्रेष्ठींकडे 

दरम्यान, राज्यसभेसाठी गोव्याहून फक्त सदानंद तानावडे यांचेच नाव पाठवावे, असे आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरले. तानावडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मंत्री विश्वजीत राणे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर, बाबू कवळेकर, खजिनदार संजीव देसाई आदींनी बैठकीत भाग घेतला.

ख्रिस्ती मतदारांना गृहित धरु नका

ख्रिस्ती धर्मीय मतदारांना गृहित धरु नका, असा सल्ला भाजपला मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला. पोर्तुगीजांच्या सर्व खाणाखुणा पुसून टाकाव्यात, असे मुख्यमंत्री बोलल्यानंतर काही ख्रिस्ती धर्मगुरु खवळले आहेत. त्यांच्यापासून भाजपला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे ख्रिस्ती मतदारांसाठी काही तरी करावे लागेल. मी स्वत: ही पोर्तुगीज खुणा पुसण्याच्याच बाजूने आहे. असे माविन बोलले.


 

Web Title: stop factionalism if st reservation is desired bjp core committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.