गाडी अडवून विचारले “लडकी चाहिए क्या?”; आमदार बोरकरांनी सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:09 PM2023-07-26T15:09:20+5:302023-07-26T15:10:12+5:30

सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची मोटार अडवून त्यांना 'लड़की चाहिए क्या?', अशी विचारणा दलालांनी केल्याची खळबळजनक माहिती विधानसभेत उघड झाली.

stopped the car and asked for girl mla viresh borkar told the story | गाडी अडवून विचारले “लडकी चाहिए क्या?”; आमदार बोरकरांनी सांगितली आपबीती

गाडी अडवून विचारले “लडकी चाहिए क्या?”; आमदार बोरकरांनी सांगितली आपबीती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची मोटार अडवून त्यांना 'लड़की चाहिए क्या?', अशी विचारणा दलालांनी केल्याची खळबळजनक माहिती विधानसभेत उघड झाली.

पर्यटन खात्याच्या अनुदान मागण्यांवर बोलताना बोरकर यांनी स्वतःच ही माहिती दिली. यासंबंधीचा व्हिडिओ सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास मी तयार आहे. पर्यटनमंत्र्यांनी या दलालांवर कारवाई करावी, असे बोरकर म्हणाले. गेले काही महिने किनारपट्टीत वेश्या व्यवसाय पुरवणाऱ्या दलालांनी जो T उच्छाद मांडला आहे त्यावरून न वातावरण तापले असताना खुद्द आमदाराने कथन केलेल्या या अनुभवामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे याचा प्रत्यय गोवेकरांना आला.

बोरकर म्हणाले की, माझी मोटार गोवा रजिस्ट्रेशनची असूनही दलालांनी अडवली. गोव्याच्या लोकांनाही हे दलाल त्यांच्या मोटारी अडवून अशी विचारणा करतात. पोलीस, पर्यटन खाते याबाबतीत कोणतेही कारवाई करत नाही. 'गोवा गर्ल्स' या नावाने इंटरनेटवर कितीतरी संकेतस्थळे न आहेत व या संकेतस्थळांच्या माध्यमातून मुली पुरवण्याचे काम केले जाते. या संकेतस्थळांवरही कोणतीच कारवाई केली जात नाही. गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्यात तीन हजारांहून अधिक महिलांवर अत्याचाराची प्रकरणे घडली. दलालांना जर कोणी किनारी किनारपट्टीतील आमदार अभय देत असेल तर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी बोरकर यांनी केली.

राज्यात वेश्या व्यवसाय, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. किनारपट्टी भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, जे आहेत ते चालत नाहीत. बेकायदा मसाज पार्लर्स कोणाच्या पाठिंबावर चालत आहेत? पर्यटन खात्याने खात्याने बेकायदा मसाज पार्लरना नोटीसा पाठवून ते बंद करावेत, अशी मागणी बोरकरांनी केली.

बोरकर म्हणाले की, आम्हाला कसिनो संस्कृती पर्यटकांना दाखवायची नाहीय. मोपा विमानतळ परिसरात येऊ घातलेल्या थीम पार्क, मिनी इंडिया संकल्पनेला त्यांनी विरोध केला. आग्याचा ताजमहाल किंवा दिल्लीचा कुतुबमिनार येथे का दाखवावा? त्याऐवजी गोव्याची वारसास्थळे दाखवा, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यसैनिकांचा सरकारकडून अपमान

राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असली तरी संबंधित घटकांना अंधारात ठेवले जाते. दोनापावला जेटीवर गाळे बांधले. परंतु स्थानिकांना विश्वासात घेतले नाही. आग्वाद कारागृह दीड कोटींना भाडेपट्टीवर दिला. तेथे दारु विकली जात आहे. दारुच्या पाठ्य चालतात. ही कसली संस्कृती ? स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्यासाठी जे बलिदान दिले त्याचा हा अपमान आहे. नूतनीकरण केलेल्या या कारागृहात प्रवेशासाठी गोवेरांनाही शंभर रुपये शुल्क मोजावे लागते.

राज्यात वेश्या व्यवसाय, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. बेकायदा मसाज पार्लर्स कोणाच्या पाठिंबावर चालत आहेत? बेकायदा मसाज पार्लरना नोटीसा पाठवून ते बंद करावेत.


 

Web Title: stopped the car and asked for girl mla viresh borkar told the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.