वीज कर्मचारी २ रोजी संपावर
By admin | Published: August 18, 2015 01:39 AM2015-08-18T01:39:33+5:302015-08-18T01:42:00+5:30
पणजी : वीज खात्याच्या खासगीकरणाविरुध्द येत्या २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपात गोव्यातील वीज कर्मचारीही सहभागी होणार आहेत. अभियंत्यांपासून
पणजी : वीज खात्याच्या खासगीकरणाविरुध्द येत्या २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपात गोव्यातील वीज कर्मचारीही सहभागी होणार आहेत. अभियंत्यांपासून लाइनमनपर्यंत सर्व कर्मचारी संपात सहभाग घेणार असल्याने त्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्यास लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.
वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजू मंगेशकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात
संपाची अधिकृत नोटीस सरकारला देण्यात आल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने वीज खात्याच्या खासगीकरणासाठी दुरुस्ती विधेयक आणले आहे.
खासगी कंपन्यांची गुंतवणूक स्वीकारण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा याकरिता हे विधेयक आणण्यात आले आहे. १0 लाखांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य त्यामुळे टांगणीला लागले आहे. कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षाही मिळत
नाही.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे विधेयक संमत झाल्यास २00३ ची पुनरावृत्ती होईल. २00३ मध्ये वीज कायद्याच्या बाबतीत जे घडले होते तसेच घडले. लोकांच्या गरजा ही कायदा दुरुस्ती भागवू शकणार नाही उलट वीज स्थिती आणखी बिकट होईल. या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांचे बैठकसत्र होणार
आहे. (प्रतिनिधी)