सरकारी तंत्रनिकेतन पणजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाबाहेर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 03:28 PM2024-01-29T15:28:29+5:302024-01-29T15:28:55+5:30

या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदनेही पाठिंबा दर्शविला.

Students of Government Technical College Panaji protest outside the college | सरकारी तंत्रनिकेतन पणजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाबाहेर निदर्शने

सरकारी तंत्रनिकेतन पणजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाबाहेर निदर्शने

पणजी :  सरकारी तंत्रनिकेतन पणजी  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असलेल्या विविध समस्या विरोधात निर्दशने केली जाेपर्यंत महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत वर्गात बसणार नसल्याचा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला. या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदनेही पाठिंबा दर्शविला.

या सरकारी तंत्रनिकेतन पणजी महाविद्यालयात  विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहेत.  महाविद्यालयात वेळ बदललेला आहे त्यामुळे विद्यार्थी उशीरा  पोहचतात या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा नाही, शौचालय व्यवस्थित नाही, याेग्य पाणी नाही छत फुटलेल आहे. खिडक्या तुटलेल्या आहेत. तसेच येते बससेवा नाही चालत जावे लागते.

त्यामुळे विद्यार्थीनींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  त्याचप्रमाणे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जिमखाना त्यांना वापरायला दिला जात नाही तेथे अन्य सरकारी कामे केली जातात. तसेच बाकड्यांचे तुटून खिळे बाहेर आले आहेत. पंखे व्यवस्थित चालत नाही. अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांना सतावत आहेत. विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी विविध शुल्क आकारले जाते पण सुविधा योग्य पुरविल्या जात नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांना केला.

  या सरकारी तंत्रनिकेतन पणजी महाविद्यालयाचे प्रार्चायांचा डिचाेली येथील तंत्रनिकतेन महाविद्यालयाचाही ताबा आहे. त्यामुळे ते या विद्यार्थ्यांना  वेळ  देऊ शकत नाही तसेच  विद्यार्थ्यांच्या  ते समस्या ऐकून घेत नाही. अजून काही विद्यार्थ्यांना ते भेटले नाही.  या विद्यार्थ्यांनी समस्या  सोडवाव्या  यासाठी प्रार्चायांना निवेदन दिले आहे. त्याला योग्य असा प्रतिसाद आलेला नाही. प्रार्चायांनी आम्हाला योग्य ते या विषयी स्पष्टीकरण द्यावे, असे या महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

 

 

Web Title: Students of Government Technical College Panaji protest outside the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.