विद्यार्थी, पालक धास्तावले
By admin | Published: April 30, 2016 02:37 AM2016-04-30T02:37:57+5:302016-04-30T02:37:57+5:30
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय एमबीबीएस, बीडीएस तसेच पदव्युत्तर
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय एमबीबीएस, बीडीएस तसेच पदव्युत्तर प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील एनईईट (नीट) परीक्षा बंधनकारक असल्याचे शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहेत. गोमेकॉ व दंत महाविद्यालय प्रवेशासाठी जीसीईटी परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, ऐनवळी राष्ट्रीय स्तरावरील एनईईटी परीक्षा लादण्यात आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. यामुळे शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नीट परीक्षा यंदा नकोच, अशी भूमिका घेत येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका सादर करण्याचे पाऊल उचलले आहे.
अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की, या निवाड्यावर फेरआढाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्याची सूचना सरकारकडून आलेली आहे आणि सोमवारी याचिका सादर करणार आहोत. येत्या १0 व ११ मे रोजी जीसीईटी परीक्षा होणार असून परीक्षा तोंडावर असताना न्यायालयाचा हा आदेश आला त्यामुळे राज्यात खळबळ उडाली.
दरम्यान, मडगावात दामोदर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तेथे दौऱ्यावर असता
भेट घेतली आणि ‘नीट’च्या बाबतीत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
(प्रतिनिधी)