महाविद्यालया बाहेर विद्यार्थ्यांचा चाकू सूरे घेऊन गोंधळ; कुजिरा संकुलात दुसऱ्यांदा फ्रीस्टाईल हाणामारी 

By वासुदेव.पागी | Published: April 3, 2024 05:07 PM2024-04-03T17:07:00+5:302024-04-03T17:07:21+5:30

विद्यालये महाविद्यालया गुंडगिरी करण्याचा हा सलग दुसरा प्रकार आहे. दीड वर्षांपूर्वी याच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील काही विद्यार्थ्यांनी पूर्वी त्यांच्या कँन्टीनमध्ये आणि नंतर भररस्त्यावर फ्रीस्टाईल हाणामारी केली होती.

Students riot outside the college with knifes; Second freestyle clash at the Kujira complex | महाविद्यालया बाहेर विद्यार्थ्यांचा चाकू सूरे घेऊन गोंधळ; कुजिरा संकुलात दुसऱ्यांदा फ्रीस्टाईल हाणामारी 

महाविद्यालया बाहेर विद्यार्थ्यांचा चाकू सूरे घेऊन गोंधळ; कुजिरा संकुलात दुसऱ्यांदा फ्रीस्टाईल हाणामारी 

पणजी: कुजिरा स्कूल कॉंप्लेसमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची रस्त्यावर फ्रीस्टाईल हाणामारीचा धक्कादायक प्रकार घडला. धारधार चाकू घेऊन हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला आहे.

हा प्रकार दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास कुजिरा - बांबोळी येथील शाळा समुहाच्या पार्कींगच्या जागेवर घडला. याच ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयातील मुलात जोरदार हाणामारी जुंपली. इतकी हाणामारी झाली की तिथे असलेल्या काही दुचाक्या आणि इतर गाड्यांचीही मोडतोड झाली. नंतर बरोबरच्या काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून हे भंडण सोडविलेही, परंतु त्यानंतर काही वेळाने पुन्हा बाचाबाची आणि नंतर पुन्हा हाणामारी सुरू झाली. यावेळी एका विद्यार्थ्याने धारधार चाकू बाहेर काढला आणि  मारण्याची धमकी देऊ लागला. तितके करून तो थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्यावर हल्लाही चढविला. तो विद्यार्थी थोडक्यात बचावल्याची माहिती ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांकडून सांगण्यात आली. 

चाकू हल्ला करणाऱ्याची ओळख पटली
दरम्यान एका विद्यार्थ्याने जेव्हा चाकू बाहेर काढला होता तेव्हाच तेथील काही जणांनी या प्रकाराची माहिती पोलीसांना दिली होती. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि काही विद्यार्थ्यांनाही गाडीत भरून आगशी पोलीस स्थानकात घेऊन  गेले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून नंगा नाच करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळखही पोलिसांना पटली आहे. तो अल्पवयीन नसल्यामुळे त्याला केव्हाही अटक केली जाऊ शकते. तो सध्या अटक चुकविण्यासाठी लपून असल्याची माहिती पणजीचे पोलीस अधीक्षक सुदेश गावडे यांनी दिली 

हा प्रकार सलग दुसऱ्यांदा
विद्यालये महाविद्यालया गुंडगिरी करण्याचा हा सलग दुसरा प्रकार आहे. दीड वर्षांपूर्वी याच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील काही विद्यार्थ्यांनी पूर्वी त्यांच्या कँन्टीनमध्ये आणि नंतर भररस्त्यावर फ्रीस्टाईल हाणामारी केली होती.
 

Web Title: Students riot outside the college with knifes; Second freestyle clash at the Kujira complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.