विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक स्तरावर विज्ञान गणिताची आवड निर्माण करावी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:56 PM2024-01-11T15:56:27+5:302024-01-11T15:57:00+5:30

विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणिताच्या विषयात असलेली भिती कमी करण्यासाठी प्राथमिक पातळीवर याेग्य ते मार्गदर्शन दिले पाहीजे.

Students should be interested in science and mathematics at primary level: Chief Minister Dr. Pramod Sawant | विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक स्तरावर विज्ञान गणिताची आवड निर्माण करावी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक स्तरावर विज्ञान गणिताची आवड निर्माण करावी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नारायण गावस

पणजी: विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणिताच्या विषयात असलेली भिती कमी करण्यासाठी प्राथमिक पातळीवर याेग्य ते मार्गदर्शन दिले पाहीजे. प्राथमिक शिक्षण  घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणिताची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असेे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्य उच्च शिक्षण संचालनालय तसेच गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीत आयाेजित केलेल्या विज्ञान ‘विज्ञान धारा २०२४ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  मुख्यंमत्री डॉ. सावंत म्हणाले विद्यार्थ्यांना काही पालकांकडून याेग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते याेग्य त्या क्षेत्राची निवड करत नाही. अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर हाेण्याचे स्वप्न असते पण त्यांना विज्ञान आणि गणिताची भिती असल्याने ही भिती दूर करणे गरजेचे आहे. यासाठी हा विज्ञान धारा कार्यक्रम विध्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. शिक्षण खाते आता प्राथमिक पातळीवर विध्यार्थ्यांना या विषयी याेग्य ते मार्गदर्शन करत आहे जेणेकरुन विद्यार्थ्यांची पुढे गणित आणि विज्ञानाची भिती कमी होईल. 

विज्ञान धारा’चा परिणाम ८ वर्षांत दिसून येणारः मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान आणि गणित विषयासंबंधी असलेली भीती दूर करण्यासाठी विज्ञान धारा गेली दोन वर्षांपासून काम करत आहे. ३० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी या कार्यक्रमाचा लाभ घेतला होता. या कार्यक्रमाला नक्कीच यश मिळाले आहे परंतु याचे परिणाम सात ते आठ वर्षांनी दिसून येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

मुख्यमंत्री प्र्रमोद सावंत यांनी सांगितले की, विद्यार्थाना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. साखळी सरकारी महाविद्यालयात स्किल्ड लायब्ररी केली आहे. तसेच अनेक शाळा डिजीटलाईज केल्या आहेत. विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे हा सरकारचा मुख्य हेतू आहे.

Web Title: Students should be interested in science and mathematics at primary level: Chief Minister Dr. Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.