एसटी विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्रे : गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:32 AM2017-07-21T02:32:09+5:302017-07-21T02:34:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
कॉँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या विविध अभ्यासक्रमांतील अनुसूचित जमातीसाठीची ५० टक्के राखीवता रद्द झाल्याची गोष्ट मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासाठी काही कारणे असल्याचे गावडे यांनी सांगितले. एक म्हणजे टक्केवारी आणि दुसरी गोष्ट या समाजातील विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमांबद्दल असलेली अनास्था. त्यासाठी जागृतीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेली किमान टक्केवारी मिळविण्यासाठी या समाजासाठी अभ्यास केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव शिरोडकर यांनी मांडला होता. तो विचाराधीन असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.