इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस यांचे उमेदवारी अर्ज सादर
By किशोर कुबल | Published: April 17, 2024 05:23 PM2024-04-17T17:23:37+5:302024-04-17T17:25:08+5:30
कॉंग्रेस भवनाजवळ कार्यकर्ते जमले व खलप यांना मिरवणुकीने जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यलयात आणले.
पणजी : इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस यांनी आपले उमेदवारी अर्ज आज रामनवमीच्या दिवशी सादर केले. कॉग्रेसनेही उमेदवार अर्ज भरताना कार्यकर्ते जमवून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला.
रमाकांत खलप यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी २ वाजता अर्ज भरला त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस फेरेरा, आपचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर आदी उपस्थित होते.
कॉंग्रेस भवनाजवळ कार्यकर्ते जमले व खलप यांना मिरवणुकीने जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यलयात आणले. ते खलप यांनी निवार्चन अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
दक्षिण गोवा मतदारसंघात विरियातो फर्नांडिस यांनी सकाळी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्यासोबतही मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. विरियातो अर्ज भरताना युरी आलेमांव, अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार वेंझी व्हिएगश आदी उपस्थित होते.