स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल आयोजित मास्टर क्लासचा यशस्वी समारोप

By समीर नाईक | Published: February 22, 2024 05:06 PM2024-02-22T17:06:44+5:302024-02-22T17:06:58+5:30

“व्यवसाय धोरणे आणि व्यवसाय रणनिती” या विषयांवर हल्लीच दोन मास्टरक्लासचे आयोजन केले होते.

Successful conclusion of master class conducted by Startup and IT Promotion Sale | स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल आयोजित मास्टर क्लासचा यशस्वी समारोप

स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल आयोजित मास्टर क्लासचा यशस्वी समारोप

पणजी: राज्य सरकारतर्फे माहिती तंत्रज्ञान विभागच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलने, “व्यवसाय धोरणे आणि व्यवसाय रणनिती” या विषयांवर हल्लीच दोन मास्टरक्लासचे आयोजन केले होते. आल्तीन्हो, पणजी येथील आयटी हब येथे हे सदर मास्टरक्लास पार पडले.

ईडीसी लिमिटेडचे माजी अध्यक्ष, तथा इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष केंकरे आणि “नॅव्हिगेटिंग इमर्जिंग भारत ब्लॉकचेन अलायन्स आणि ग्रीन चेन प्रोटोकॉलचे संस्थापक, तथा भारतीय सरकारी संस्थांचे स्टार्टअप तंत्रज्ञान सल्लागार राज कपूर हे या मास्टरक्लासला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. 

या मास्टरक्लासमध्ये विविध पार्श्वभूमीतील सहभागी उपस्थित होते. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅपल, वॉलमार्ट इत्यादी आघाडीच्या कंपन्यांच्या नवीन व्यवस्थापन पद्धतींमधून काढलेल्या कृती योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केलेल्या व्यवसाय रणनीती आणि व्यवसाय तंत्रे या सत्रात वित्त, खर्च, किंमत, बजेट आणि पुनरावलोकन तसेच व्यवसाय प्रक्रियेचे कायदेशीर आणि अनुपालन पैलू यासारख्या धोरणात्मक विचारांवर भर देण्यात आला. 

कृत्रिम साधने स्टार्टअप्सना मार्केट रिसर्च, ग्राहक संपादन, उत्पादन विकास, विक्री आणि विपणन धोरणांसह विविध पैलूंवर माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतात. ज्यामुळे कार्यक्षमता, उत्पादकता आणि यशाचा आलेख वाढतो. या सत्राने स्टार्टअपसाठी कृत्रिम प्रज्ञा आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. 

पर्यावरण-अनुकूल तंत्रज्ञान स्टार्टअप्स, डिजिटल आरोग्य, ॲग्रीटेक, सायबर सुरक्षा उपाय आणि सुपर ॲप्सवर लक्ष केंद्रित करणे यासह कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या ट्रेंडवर चर्चा करून या सत्राचा समारोप झाला. 

सहभागींनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला, उत्पादकता, केस स्टडीज, शोध आणि विकास आर्थिक व्यवस्थापन यावरील आपली मते मांडली आणि त्यांच्या स्टार्टअप प्रवासात येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली.

Web Title: Successful conclusion of master class conducted by Startup and IT Promotion Sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा