इफ्फीच्या उद्घाटनाची जय्यत तयारी, 'कॅचिंग डस्ट' चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 05:25 PM2023-11-19T17:25:25+5:302023-11-19T17:26:45+5:30

यंदा इफ्फीला आतापर्यत ६.५ हजार प्रतिनिधींची नाेंदणी झाली आहे.

Successfully preparing for the inauguration of IFFI the movie Catching Dust will open the screens of IFFI | इफ्फीच्या उद्घाटनाची जय्यत तयारी, 'कॅचिंग डस्ट' चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार

इफ्फीच्या उद्घाटनाची जय्यत तयारी, 'कॅचिंग डस्ट' चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार

नारायण गावस

पणजी: उद्या २० नोव्हेबर रोजी गोव्यात हाेणाऱ्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा  'कॅचिंग डस्ट' या युकेच्या चित्रपटाने पडदा उघडणार आहे. उद्या सायं. ५ वा. ताळगाव येथाील श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर होणाऱ्या भव्य दिव्य अशा या उद्घाटन साेहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित तसेच शाहीद कपूर यांच्या नृत्याचे खास आकर्षण असणार आहे. इफ्फीची पूर्ण तयारी झालेली आहे.

प्रतिनिधी पास देण्यास सुरुवात
यंदा इफ्फीला आतापर्यत ६.५ हजार प्रतिनिधींची नाेंदणी झाली आहे. नोंदणी केलेल्या प्रतिनिधींचा इफ्फी कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. तसेच डे डेलिगेट पासही मिळणार आहे. तसेच गेस्ट पासची साेय केली आहे. त्यामुळे प्रतिनिधींची यंदाच्या इफ्फीमध्ये संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात देश विदेशातील प्रतिनिधींची संख्याही लक्षणीय आहे.

दिग्गज कलाकारांची लाभणार उपस्थिती
यंदाच्या उद्घाटनाला  शहिद कपूर,  माधुरी दिक्षित,  श्रिया सरम यांच्या प्रमाणे इफ्फीत यंदा बॉलिवूडचे दिग्गज कलाकार येणार आहेत यात सलमान खान,  सनी देओल, मधुर भांडारकर, के के मेनन, विजय सेतुपती, बोनी कपूर, गुलशन ग्रोवर, करण जोहर, अल्लू अर्जुन, कार्तिकी गॉसल्विस हे कलाकार देखील येणार आहेत. तर मायकल डग्लस, ब्रिलटि मेंडोझा, ब्रेंडन गाल्विन हे विदेशी कलाकार देखील येणार आहेत.

सिने मेला खास आकर्षण
इफ्फीमध्ये 'सिने मेला' हे खास आकर्षण असणार आहे.  प्रतिनिधी नोदणी न केलेल्या लाेकांना यंदा इफ्फीनिमित्त पणजीतील 'योग सेतू' येथे इफ्फीतील 'सिने मेळा' आयोजित करण्यात येणार आहे. २१ ते २८ ह्या दरम्यान येथे हा 'सिने मेळा' होणार असून, तेथे सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन होणार आहे. तेथे सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन घडवणरे स्टॉल्स असतील. त्याशिवाय तेथे फूड स्टॉल्स, गोव्याच्या हस्तकलेचे स्टॉल्स, कला प्रदर्शनासाठीचा मंच असेल. गोव्यातील लोकांनी ह्या सिने मेळ्याचा आनंद  घेता येणार आहे.

Web Title: Successfully preparing for the inauguration of IFFI the movie Catching Dust will open the screens of IFFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा