३१ डिसेंबरला सनबर्नचे आयोजन रद्द; आमदार डिलायला लोबो यांची माहिती
By काशिराम म्हांबरे | Published: December 2, 2023 02:54 PM2023-12-02T14:54:39+5:302023-12-02T14:55:31+5:30
स्थानीक आमदार डिलायला लोबो यांनी या संबंधीची माहिती पत्रकारांना दिली.
वागातोर-हणजूण येथील काही स्थानीकांनी, व्यवसायिकांनी तसेच लोकप्रतिनीधींनी ३१ डिसेंबर या दिवशी सनबर्नमहोत्सवाच्या आयोजनाला हरकत घेतल्यानंतर त्या दिवशीचा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.
स्थानीक आमदार डिलायला लोबो यांनी या संबंधीची माहिती पत्रकारांना दिली. २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान सनबर्न महोत्सवाचे वागातोर परिसरात आयोजन करण्यात आला आहे. स्थानिकांनी आपली कैफियत आमदार डिलायला लोबो यांच्याशी मांडली होती. आमदारांनी नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावेळी ३१ रोजी महोत्सव होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला स्पष्ट केल्याची माहिती लोबो यांनी पत्रकारांना दिली.
डिलायला लोबो यांच्या सोबत कळंगुटचेआमदार मायकल लोबो तसेच इतर काही पक्षांकडून ३१ डिसेंबर रोजीच्या आयोजनाला विरोध दर्शवला होता. त्या दिवशी महोत्सवाचे आयोजन रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली. ३१ डिसेंबर रोजी ख्रिश्चन समाजातील लोक मध्यरात्री चर्चीत प्रार्थनेसाठी जातात. त्या दिवशी स्थनिकांना रेस्टॉरंटातील व्यवसाय चांगल्या पद्धतीनेचालतो. महोत्सव झाल्यास या सर्वांवर त्याचे परिणाम होतील अशी माहिती लोबो यांनी दिली. आपल्या मते पहिल्या तीनच दिवशी या महोत्सवाचे आयोजन व्हायला हवे असेही त्या म्हणाल्या.