सनबर्नने सरकारचा जावई होऊ नये, दुर्गादास कामत यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:06 PM2023-12-06T16:06:26+5:302023-12-06T16:06:36+5:30
सनबर्नचे आयोजक सरकारचे जावई झाले आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला.
- नारायण गावस
पणजी: सनबर्नने सरकारचा जावई होण्याचा प्रयज्ञ करु नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच शिवोलीच्या स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनी ३१ डिसेंबरला वागातोर येथे सनबर्न होणार नसल्याचे सांगितले आहे. तरीही काही ॲपवर चोरट्या मार्गाने सनर्बनची तिकीट विकली जात आहे. याचा अर्थ हे सनबर्नचे आयोजक सरकारचे जावई झाले आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला.
३१ डिसेंबरला कुठलीच परवानगी मिळत नसताना असेच चोरट्या मार्गाने अशा ॲपवर तिकीट विक्री केली जात आहेत. एक तर ते सरकारच्या आदेशाला मानत नसेल किवा ते सरकारचे जावई झाले आहेत. स्थानिक पंचायतीच्या आमदारांना तसेच लोकांना ३१ डिसेबरला सनबर्न पार्टी नको आहे. यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. लोकांना कुठेही फिरायला जाता येत नाही, असे असताना सनबर्नच्या आयोजनाच्या परवानगी शिवाय सर्व तयारी केली जाते. हे चुकीचे आहे. याचा आम्ही गाोवा फॉरवर्ड पक्षातर्फे विरोध करतो, असे दुर्गादास कामत म्हणाले.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही याचा विरोध केला आहे. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने गोव्यात असे संगीताचे कार्यक्रम होत आहेत. पण त्यांनी सरकारचे कायदा सुव्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. जर स्थानिकांना हा सनबर्न नको असेल तर आम्हाला हा सनबर्न नको आहे. यातून स्थानिकांना काहीच फायदा नसतो. त्यामुळे ३१ डिसेंबरला रात्री स्थानिक लोकांना कुठे बाहेर फिरायला जात येत नाही. सर्वत्र गर्दी असते. पण आयोजक आपल्याला हवे ते करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असे दुर्गादास कामत यांनी सांगितले.