सनबर्नमुळे पर्यटकांची संख्या वाढेल - मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 08:29 PM2019-12-21T20:29:49+5:302019-12-21T20:30:23+5:30
पर्यटकांची संख्या यावेळी कमी आहे पण इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवामुळे येत्या आठवडय़ात संख्या वाढेल.
पणजी : सनबर्न क्लासिकसारख्या इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवामुळे (ईडीएम) गोव्यात पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटकांसाठी हा महोत्सव मोठे आकर्षण आहे व त्यामुळे आम्ही महोत्सवाचे समर्थन करतोय असे गोव्याचे विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.
लोबो यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले की, पर्यटकांची संख्या यावेळी कमी आहे पण इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवामुळे येत्या आठवडय़ात संख्या वाढेल. गेल्या आठवडय़ात किनारपट्टीत अनेक ठिकाणच्या हॉटेलांच्या खोल्यांचे बुकिंग हे खूप कमी होते. पन्नास टक्के खोल्या रिकाम्या असल्याचे अनेक व्यवसायिक सांगत होते पण येत्या आठवडय़ात पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर हॉटेलांनाही व्यवसाय मिळेल.
मंत्री लोबो म्हणाले, की सनबर्नसारखा सोहळा गोव्यात एकदाच होतो आणि तोही वर्ष अखेरीस होतो. वास्तविक गोव्यात वर्षातून दोनवेळा असो महोत्सव व्हायला हवा. वाहतूक व्यवस्था व सुरक्षेविषयी पोलिस काळजी घेतीलच. मात्र महोत्सव बंद करणो म्हणजे पर्यटन व्यवसायाचे नुकसान असा अर्थ होईल. आवश्यक ते सगळे परवाने प्राप्त करून ईडीएम व्हायला हवेत. हजारो पर्यटकांचा सहभाग ईडीएममध्ये असतो. देश- विदेशातून त्यासाठी पर्यटक येतात. सद्या राज्यात खनिज खाण व्यवसाय पूर्णपणो बंद आहे. अशावेळी पर्यटन उद्योग तरी आम्ही सांभाळून ठेवायला हवा. माङयाकडे तीन हॉटेल्स आहेत. पर्यटन व्यवसायाच्या गरजा मला ठाऊक आहेत.
दरम्यान, खाण बंदीच्या पाश्र्वभूमीवर बोलताना मंत्री लोबो म्हणाले, की येत्या जानेवारी महिन्यात जर खाण व्यवसाय सुरू होण्याबाबत सरकारला काही दिलासा मिळाला नाही तर गोवा सरकारने स्वत: खनिज विकास महामंडळ स्थापन करून खाण व्यवसाय त्या महामंडळामार्फत चालवावा असे माङो स्पष्ट मत आहे.