सनबर्नच्या ध्वनीक्षेपकांमुळे त्रास होतो, स्थानिक विशेष मुलाची न्यायालयात धाव
By वासुदेव.पागी | Published: December 20, 2023 04:01 PM2023-12-20T16:01:46+5:302023-12-20T16:05:38+5:30
ही पार्टी जिथे होणार असलेल्या ठिकाणा जवळच हा मुलगा राहतो. मुलाच्या याचिकेची न्यायालयानेही दखल घेतली आहे.
पणजी: सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हलमध्ये वाजणाऱ्या ध्वनिक्षेपकांचा आपल्याला खूप त्रास होत असल्याचा दावा करून वागातोर येथील एका विशेष मुलाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका केली आहे. ही पार्टी जिथे होणार असलेल्या ठिकाणा जवळच हा मुलगा राहतो. मुलाच्या याचिकेची न्यायालयानेही दखल घेतली आहे.
सरकारला त्या मुलाने मांडलेल्या सूचनेचा राज्य सरकारने विचार करावा, असा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. वागातोर येथे सनबर्न महोत्सवाच्या आयोजनाला सरकारने परवानगी दिली आहे. परवानगी ही सशर्त असल्याचे पर्यटन खात्याने म्हटले आहे. पर्यटन खात्याकडून पार्टीच्या आयोजकांवर 28 अटी लादल्या आहेत. या अटींचा भंग केल्यास परवामगी रद्ध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्टीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. शिवाय राज्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.