श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांना सर्वोच्च दणका; गोव्यातील प्रवेशबंदी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 09:02 PM2019-04-05T21:02:46+5:302019-04-05T21:03:30+5:30

गोवा प्रवेश बंदीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

Supreme court rejects pramod Muthaliks plea over Goa entry ban | श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांना सर्वोच्च दणका; गोव्यातील प्रवेशबंदी कायम

श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांना सर्वोच्च दणका; गोव्यातील प्रवेशबंदी कायम

googlenewsNext

पणजी : श्रीराम सेनेचे सर्वेसर्वा प्रमोद मुतालिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. गोवा प्रवेश बंदीला आव्हान देणारी त्यांची याचिका फेटाळली शुक्रवारी फेटाळून लावण्यात आली. न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या पीठाने मुतालिक यांची याचिका फेटाळताना त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे. 

2014 साली गोवा सरकारने मुतालिक यांना राज्यात प्रवेश करण्यावर बंदी घातली. त्यानंतर दर 60 दिवसांनी हा बंदीकाळ वाढवण्यात आला. 24 जानेवारी 2009 रोजी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळूरु येथे एका पबमध्ये घुसून महिलांना मारहाण केली होती. पबमध्ये जाऊन या महिला देशाची संस्कृती, नीतीमूल्ये पायदळी तुडवत असल्याचा संघटनेचा आरोप होता. मारहाणीच्या या प्रकरणात मंगळुरु कोर्टाने नंतर पुराव्यांअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती. मुतालिक यांनी गोव्याच्या बाबतीतही प्रक्षोभक विधाने केल्याने सरकारने त्यांना गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घातली. 

Web Title: Supreme court rejects pramod Muthaliks plea over Goa entry ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.