ब्रिक्स परिषदेनिमित्त 11 देशांतील सर्वोच्च नेते गोव्यात येणार
By admin | Published: September 12, 2016 10:10 PM2016-09-12T22:10:51+5:302016-09-12T22:10:51+5:30
जगभरातील अकरा देशांतील सर्वोच्च नेते येत्या महिन्यात ब्रिक्स परिषदेनिमित्त गोव्यात येणार आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १२ - जगभरातील अकरा देशांतील सर्वोच्च नेते येत्या महिन्यात ब्रिक्स परिषदेनिमित्त गोव्यात येणार आहेत. गोव्यातील अरुंद रस्ते ही एक चिंतेची गोष्ट आहे. तथापि, त्यावरही मात केली जाईल. गोवा पोलिसांसह महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिस ब्रिक्स परिषदेवेळी गोव्यात अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्रलयाच्या शिष्टाचार विभागाचे प्रमुख संजय वर्मा यांनी ही माहिती येथे पत्रकारांना दिली. ब्रिक्समध्ये ज्या देशांचा सहभाग होतो ते देश तर येतीलच पण श्रीलंका, भुतान, थायलंड आदी देशांचे प्रमुखही ब्रिक्समध्ये सहभागी होतील. 1983 साली गोव्यात चोगम परिषद झाली होती. त्यानंतर 33 वर्षानी ब्रिक्सच्या रुपात जागतिक सोहळा गोव्यात होत आहे.
तीन दिवस गोव्यातील लोकांना थोडी गैरसोय सहन करावी लागेल. अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेच्यादृष्टीकोनातून थोडी बंधने येतील. गोव्यातील रस्ते अरुंद असले तरी, त्यास पर्याय नाही. कारण तेवढाच विचार केला तर गोव्यात काहीच होऊ शकले नसते. गोव्यात होणा:या ब्रिक्स परिषदेमुळे जगाचे लक्ष गोव्यावर जाईल. जागतिक स्तरावर गोव्याची प्रसिद्धी होईल, असे वर्मा म्हणाले.
आठशे ते नऊशे प्रतिनिधी ब्रिक्समध्ये सहभागी होतील. व्यापार व गुंतवणुकीच्यादृष्टीने गोव्याला ब्रिक्स परिषद उपयुक्त ठरेल. कारण गोवा आर्थिक वाढीच्या मार्गावर आहे. गोवा हे केवळ पर्यटन राज्य नव्हे. चीनमध्ये ब्रिक्स परिषद ज्या शहरात झाली होती, त्या शहरातील पन्नास टक्के लोकांना परिषदेवेळी मुद्दाम सुट्टीवर पाठविण्यात आले होते, मात्र गोव्यात तसे काही केले जाणार नाही. गोमंतकीयांची गैरसोय कमीच कमी प्रमाणात व्हावी एवढी काळजी घेतली जाईल. नौदल, हवाई दल, तट रक्षक दल वगैरे सुरक्षेबाबत काळजी घेईल. शिवाय महाराष्ट्र व दिल्ली पोलिसही सहाय्य करतील, असे वर्मा म्हणाले.
15 व 16 ऑक्टोबर रोजी ब्रिक्स होत असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराजही सहभागी होतील.