गोव्यात खासगी वन क्षेत्रांचे सोमवारपासून सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 05:36 PM2019-01-04T17:36:13+5:302019-01-04T17:36:30+5:30

खासगी वन क्षेत्राविषयी राज्यात खूप वाद आहेत. खासगी वन क्षेत्र निश्चित झाल्याने लोकांना आपल्या काजू बागायतीतही अडचणी येत आहेत.

Survey of private sector forest in Goa from Monday | गोव्यात खासगी वन क्षेत्रांचे सोमवारपासून सर्वेक्षण

गोव्यात खासगी वन क्षेत्रांचे सोमवारपासून सर्वेक्षण

Next

पणजी : राज्यातील जे क्षेत्र पूर्वीच्या सरकारी समितीने खासगी वन क्षेत्र म्हणून निश्चित केले होते, त्या क्षेत्रचे नव्याने सव्रेक्षण करून आढावा घेण्यासाठी नेमल्या गेलेल्या फेरआढावा समितीने आपले काम सुरू केले आहे. याच कामाचा एक भाग म्हणून येत्या सोमवारपासून म्हणजे दि. 7 पासून तिसवाडी, धारबांदोडा व सत्तरी या तीन तालुक्यांमधील खासगी वन क्षेत्रविषयी वन खात्याचे कर्मचारी सव्रेक्षण करणार आहेत.

खासगी वन क्षेत्रविषयी राज्यात खूप वाद आहेत. खासगी वन क्षेत्र निश्चित झाल्याने लोकांना आपल्या काजू बागायतीतही अडचणी येत आहेत. तसेच घरांचा विस्तार करताना, बांधकाम करतानाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दोन-तीन वर्षापूर्वी गोवा विधानसभेतही हा विषय खूप गाजलेला आहे. सरकारने 23 एप्रिल 2018 रोजी फेरआढावा समिती नेमली. वन खात्याच्या उपवनपालांच्या कार्यालयाकडे फेरआढावा समितीने फिल्ड पडताळणी अहवाल मागितले आहेत. त्यामुळे येत्या दि. 7 पासून वन कर्मचारी तीन तालुक्यांमध्ये खासगी वन क्षेत्रची पाहणी करणार आहे. पूर्वीच्या समितीने निश्चित केलेले वन क्षेत्र कर्मचा:यांकडून फिल्ड रिपोर्टसाठी पाहिले जाईल. त्याबाबतची सार्वजनिक नोटीस शुक्रवारी जारी झाली आहे. खासगी वन क्षेत्र असलेल्या जमिनींचे मालक, ऑक्युपंट्स, जमिनींसाठीचे प्रतिनिधी यांनी फेरआढावा समितीसाठी खासगी वन क्षेत्रंचे प्रत्यक्ष सव्रेक्षण सुरू होत आहे हे लक्षात घ्यावे, असे या नोटीशीद्वारे कळविण्यात आले आहे.

तिसवाडीतील गवंडाळी, बायंगिणी, एला, मंडूर, आजोशी, नेवरा, चिंबल तसेच धारबांदोडय़ातील मोले, सांगोड, पिळयें, धारबांदोडा तसेच सत्तरीतील पणशें, असोळें, भिरोंडा, वांते, नागवे-म्हावशी, मेळावली- गुळेली, कणकिरे आदी भागांमध्ये येत्या दि. 7 पासून सव्रेक्षण सुरू होईल. सवेक्षणावेळी ग्रामपंचायतीने उपस्थित रहावे म्हणून संबंधित खासगी वन क्षेत्रतील जमीन मालकांनी व व जमिनीच्या परिसरातील बागायतदार वगैरेंनी पंचायत कार्यालयांशी संपर्क साधावा, असे उपवनपालांना अपेक्षित आहे. वन खात्याचे कर्मचारी येतील तेव्हा पंचायतीने व जमीन मालक किंवा अन्य घटकांनी सहकार्य करावे असे अपेक्षित आहे.

Web Title: Survey of private sector forest in Goa from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.