मोर्चा न आणल्यामुळे बचावले, पोलिसांची योजना व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 09:12 PM2018-04-02T21:12:15+5:302018-04-02T21:12:15+5:30

खाण अवलंबितांचा नियोजित मोर्चा सोमवारी झालाच नसल्यामुळे खरा हिरेमोड झाला तो पोलिसांचाच.

Survived by not having a front, police plans were in vain | मोर्चा न आणल्यामुळे बचावले, पोलिसांची योजना व्यर्थ

मोर्चा न आणल्यामुळे बचावले, पोलिसांची योजना व्यर्थ

Next

पणजी: खाण अवलंबितांचा नियोजित मोर्चा सोमवारी झालाच नसल्यामुळे खरा हिरेमोड झाला तो पोलिसांचाच. कारण यापूर्वीच्या मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांना केवळ नावे ठाऊक नसल्यामुळे समन्स गेले नव्हते परंतु त्यांचे चेहरे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्या पैकी कुणी सोमवारच्या मोर्चात सहभागी झाल्यास ते आयतेच तावडीत सापडणार म्हणून पोलीस प्रतीक्षेत होते. 
१९ मार्चच्या मोर्चात जितके लोक सहभागी झाले होते आणि जितक्या लोकांनी रस्त्यावर धिंगाणा घातला होता त्या सर्वांना ड्रोन कँमºयाद्वारे टीपले गेले होते. हे रेकॉर्डींग पाहून पोलीस ज्या आंदोलकांची नावासह ओळख पटवू शकले त्यांनाच पोलीस समन्स पाठवू शकले होते. परंतु असे कित्येक चेहरे त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये असे आहेत की ज्यांचे नाव गाव पत्ता अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालूच आहेत. आंदोलकांनी जाहीर केलेला सोमवारचा मोर्चा ही पोलिसांसाठी एक त्या दृष्टीने संधी होती. रेकॉर्डिंगमधील चेहरे दिसले की त्याला लगेच उलण्याची नीतीही ठरली होती. त्यासाठी सर्व व्यवस्थाही करण्यात आली होती. बसगाड्या, पोलीस फौजफाटा, लाठ्याही तय्यार होत्या. परंतु ४ वाजता होणार असलेल्या या मोर्चासाठी  ५ वाजून गेल्यानंतरही कुणीच फिरकले नसल्यामुळे प्रतीक्षा करणाºया पोलिसांचीही निराशा झाली. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोर्चा आलाच तर तो कठोरपणे हाताळण्याचा आदेशही पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आला होता. कायद्या सुव्यवस्था बिघडण्याचे साधे प्रयत्न जरी कुणी केले तरी कुणाची गय करू नका असे त्यांना सांगण्यात आले होते. १९ मार्चच्या पोलीस कारवाईला लोकांकडून आणि विशेषत: माद्यमांकडून मिळालेल्या शाबासकी व सकारात्मक प्रतिसादामुळेच पोलिसांनी यावेळी कडक पवित्रा घेतला असण्याची चर्चा पणजी पोलीस स्थानकात होती.

Web Title: Survived by not having a front, police plans were in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.