नामवंत सिनेछायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 04:02 AM2020-01-25T04:02:23+5:302020-01-25T04:02:57+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत छायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांचे नुकतेच दहिसरमध्ये निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
पणजी - मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत छायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांचे नुकतेच दहिसरमध्ये निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
सूर्यकांत लवंदे यांनी ६0 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांना छायाचित्रणाने नटवले. त्यांनी प्रामुख्याने सचिन पिळगावकर, महेश कोठारे, डॉ. जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं. सामना, सिंहासन, नवरी मिळे नवऱ्याला अशा अनेक चित्रपटांचे ते छायाचित्रकार होते. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. यात महाराष्ट्र राज्याचा आठ वेळा व केंद्र सरकारचा एकदा उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून पुरस्कार लाभले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च मानाचा व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता.