गोव्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी संशयित कर्नाटकात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:20 PM2019-06-23T18:20:31+5:302019-06-23T18:21:02+5:30
गोव्यात एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावताना संशयिताला शेजारच्या कर्नाटक राज्यातील कारवार येथे अटक केली.
मडगाव : गोव्यात एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावताना संशयिताला शेजारच्या कर्नाटक राज्यातील कारवार येथे अटक केली. कृष्णकुमार दुबे (34) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ मुंबई येथील आहे. अधिक तपासासाठी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिडीताला वैदयकीय चाचणीसाठी इस्पितळात पाठवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडिताच्या कुटुंबियाने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार फातोर्डा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तपासात ही मुलगी कारवार येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर व पोलिसांनी कारवार येथे जाउन संशयिताला अटक करुन त्या मुलीला गोव्यात आणले. संशयिताने कारवार येथील आपल्या एका मित्रच्या घरी त्या मुलीला ठेवले होते असेही तपासात उघड झाले आहे. भारतीय दंड संहितेंच्या 363 व गोवा बाल कायदा कलम 8 अतर्ंगत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.