उत्तर प्रदेशातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी संशयित गोव्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 08:48 PM2019-08-26T20:48:25+5:302019-08-26T20:48:30+5:30
उत्तर प्रदेश येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून गोव्यात आणण-या संशयिताची आज सोमवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील बाणावली येथे मुसक्या आवळल्या.
मडगाव: उत्तर प्रदेश येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून गोव्यात आणण-या संशयिताची आज सोमवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील बाणावली येथे मुसक्या आवळल्या. कोलवा पोलिसांनी ही कारवाई केली. मोहम्मद नौशाद (20) अहे या संशयिताचे नाव आहे. तो दीड महिन्यांपासून बाणावली येथे भाडयाच्या घरात राहात होता. या भागात तो गवंडी काम करीत होता. संशयिताला व त्या युवतीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
17 एप्रिल रोजी पिडीत युवतीचे उत्तर प्रदेशातील सारंगपूर येथून अपहरण झाले होते. मागाहून यासंबधी तेथील पोलीस ठाण्यात यासंबधी तक्रारही नोंद झाली होती. तेथील पोलिसांना संशयित गोव्यात असल्याची पक्की माहिती मिळाली होती. पोलीस अधिकारी सुनील कुमार हा आपल्या पथकासह संशयिताच्या शोधासाठी गोव्यात आला होता. कोलवा पोलिसांना त्यांनी या संशयिताबददल माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी काल सोमवार बाणावली येथे मोहम्मद याला ताब्यात घेतले व नंतर पिडीताची सुटकाही केली. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल परब यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयबी पोलीस पथकाचे विकास कौशिक व सर्वेश वेळीप यांनी संशयिताला पकडले.