शेतीबागायतीत सांडपाणी साेडतात त्यांच्यावर कारवाई करा, मेरशी पंचायतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 04:14 PM2023-12-23T16:14:04+5:302023-12-23T16:14:56+5:30
Goa News: मेरशीतील शेती बागायतीत तसेच पाण्याचा खाडीत बेकायदेशीर टॅँकरने आणून सांडपाणी सोडले जात आहे. या विषयी आम्ही पाेलीस तक्रारही दाखल करुन पोलीसांनी याची चौकशीही केली आहे.
- नारायण गावस
पणजी - मेरशीतील शेती बागायतीत तसेच पाण्याचा खाडीत बेकायदेशीर टॅँकरने आणून सांडपाणी सोडले जात आहे. या विषयी आम्ही पाेलीस तक्रारही दाखल करुन पोलीसांनी याची चौकशीही केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखाेल चौकशी करुन त्यांच्यावर करवाई करावी, अशी मागणी मेरशी पंचायतीचे सरपंच प्रमोद कामत यांनी केली.
सरपंच प्रमोद कामत म्हणाले, मेरशी पंचायत क्षेत्रात येणाऱ्या या दुधी भाजीच्या शेतमळ्यात टॅँकरने सांडपाणी आणून साेडले जात आहे. शुक्रवारी असेच एका टॅँकरने सांडपाणी साेडले जात असल्याचे निदर्शनात आले. आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी जाउन पाहणी केली. तसेच त्यांच्या विरोधात तक्रारही केली. तसेच या टॅँकरची पाेलिसांनी चौकशी सुर केली आहे. भाजीच्या शेतात असे सांडपाणी सोडून लाेकांच्या आराेग्याशी खेळले जात आहे. हीच भाजी लाेक नंतर खात असतात. तसेच याच खाडीच्या पाण्यात सांडपाणी साेडले जाते. नंतर याच खाडीतील मासे लाेक खातात त्यामुळे असे लाेकांच्या आराेग्याशी खेळू नये. असे जे या ठिकाणी सांडपाणी सोडतात त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
सरपंच प्रमोद कामत म्हणाले, हा सांडपाण्याचा टॅँकर कॅसिनाेचा होताे असे सांगितले आहे. तो कुठलाही असा आम्ही मेरशी पंचायत क्षेत्रात असे सांडपाणी टॅँकरचे पाणी सोडू देणार नाही. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी सखाेल चाैकशी करावी. तसेच पुढे असे प्रकार आम्ही मेरशी पंचायत क्षेत्रात खपवून घेणार नाही. पाेलिसांनीही या विषयी दाेषींवर कारवाई करावी.