त्या दोषींवर कडक कारवाई करा; आयएमए गोवा शाखेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 04:14 PM2024-05-26T16:14:50+5:302024-05-26T16:17:47+5:30
वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून शारीरिक हिंसाचार आणि अत्याचाराला न घाबरता त्यांच्या रुग्णांना न्याय द्यावा ही आमची इच्छा असते.
नारायण गावस
पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या १४२ वार्डमधील डॉक्टरवर दोन महिलांनी हल्ला केल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा राज्य शाखेने डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. गोवा मेडिकेअर ॲक्ट २०१३ नुसार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून शारीरिक हिंसाचार आणि अत्याचाराला न घाबरता त्यांच्या रुग्णांना न्याय द्यावा ही आमची इच्छा असते. पण काही रुग्णांचे नातेवाईक हे सत्य परिस्थिती जाणून न घेता डॉक्टरांवर हल्ले करतात. हे चुकीचे आहे. यासाठी गोवा वैद्यकीय सेवा कर्मचारी आणि वैद्यकीय सेवा संस्था यांच्या सुरक्षेसाठी कायदा अंमलात आणला पाहिजे. आज अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले हाेते आहेत.
या कायद्यानुसार दाेषींवर कारवाई झाली पाहिजे. पुढे कुणीच अशा प्रकारचे धाडस करणार नाही आम्ही आयएमए यासाठी सरकारला निवेदन देणार आहे. वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टरांवर अशा प्रकारे हल्ला होणे हे खूपच घातक आहे यामुळे डॉक्टरांच्या मौल्यवान कार्याला न्याय मिळत नाही. असेही आयएमएचे अध्यक्ष डॉ. संदेश चाेडणकर यांनी म्हटले आहे.