गोव्यात आणखी एका सेक्स स्कँडलची चर्चा; मंत्री, महिलेची सायबर विभागाकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:45 AM2023-08-28T05:45:00+5:302023-08-28T05:45:23+5:30
मंत्री गुदिन्हो यांच्यावतीने दाखल तक्रारीनुसार कोणीतरी खोटी पोस्ट व्हायरल करून मंत्र्यांची विनाकारण बदनामी केली आहे.
वास्को : गोव्याच्या एका मंत्र्याच्या कथित सेक्स स्कॅण्डलच्या वृत्ताची राज्यभर चर्चा सुरू आहे. याबाबत रविवारी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचे खासगी सचिव निहाल केणी यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार दिली. तर मुरगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्राशी संबंधित एका महिलेने सायबर क्राइम पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
मंत्री गुदिन्हो यांच्यावतीने दाखल तक्रारीनुसार कोणीतरी खोटी पोस्ट व्हायरल करून मंत्र्यांची विनाकारण बदनामी केली आहे. संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार बदनामी करण्यासाठी सोशल मीडियात इंग्रजी माध्यमातील एका
वृत्ताखाली माझा फोटो जोडून तो व्हायरल करण्यात येत आहे. अशी बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्या तक्रारीची प्रत वास्को पोलिस स्थानकातही दिली असून महिलेच्या तक्रारीबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.
कोण तो दुसरा मंत्री?
- शनिवारी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी एका वृत्तपत्रातील एक वृत्त ट्वीट करत सेक्स स्कॅण्डलमध्ये सामिल कोण तो दुसरा मंत्री?’, असा प्रश्न उपस्थित केला. चोडणकर यांनी त्या नाजूक प्रकरणाची माहिती दिल्ली दरबारी पोहोचवल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
- ‘पॉलिटिशियन इन्व्हॉल्व्ड इन सेक्स स्कॅण्डल/किडनॅपिंग?’ ह्या शिर्षकाच्या खाली संबंधित महिलेचा फाेटाे चिकटवून ताे व्हायरल केला जात असल्याचे महिलेने पाेलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.