तीन अटी मान्य केल्या तरच इंडिया आघाडीसोबत जागा वांटपाबाबत चर्चा - आरजीची भूमिका
By किशोर कुबल | Updated: April 15, 2024 16:18 IST2024-04-15T16:17:37+5:302024-04-15T16:18:17+5:30
पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी ही माहिती देताना सांगितले की,' आम्ही इंडिया आघाडी सोबत जागा वाटपाबाबत वाटाघाटी करण्यास तयार आहोत.

तीन अटी मान्य केल्या तरच इंडिया आघाडीसोबत जागा वांटपाबाबत चर्चा - आरजीची भूमिका
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात इंडिया आघाडी सोबत जागा वाटपाबाबत आरजीने तीन अटींवर तयारी दर्शवली असून आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.
पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी ही माहिती देताना सांगितले की,' आम्ही इंडिया आघाडी सोबत जागा वाटपाबाबत वाटाघाटी करण्यास तयार आहोत. परंतु त्यासाठी आमच्या तीन अटी काँग्रेस व आघाडीतील त्यांच्या मित्र पक्षांनी आधी मान्य कराव्या लागतील. या तीन अटी म्हणजे म्हादई नदीवरील कर्नाटकचा पळसा भंडुरा प्रकल्प मोडीत काढणार ,असे काँग्रेसने राष्ट्रीय जाहीरनाम्यात घोषित करावे. दुसरी अट म्हणजे गोव्यात सरकारी व कोमुनिदाद जमिनींमधील परप्रांतीयांच्या झोपड्या पाडणार व त्यांची मतदार ओळखपत्रे रद्द करणार, असे काँग्रेसने राज्य जाहीरनाम्यात घोषित करावे आणि तिसरी अट म्हणजे भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी 'पोगो' विधेयकाला पाठिंबा द्यावा.'
परब म्हणाले की 'या तीन अटी आधी काँग्रेस व इंडिया आघाडीतील त्यांच्या मित्र पक्षांनी मान्य केल्या तरच आम्ही जागा वाटपाबाबत वाटाघाटीसाठी चर्चेला येऊ.गोव्यात दोन जागा आहेत पैकी एक जागा आरजीला द्यावी किंवा दोन्ही जागा आरजीने लढवाव्यात किंवा दोन्ही जागा इंडिया आघाडीने लढवाव्यात याबाबत या
तीन अटी आधी मान्य केल्यानंतरच चर्चेला सुरुवात होईल.'