भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवला
By किशोर कुबल | Published: December 9, 2023 05:25 AM2023-12-09T05:25:15+5:302023-12-09T05:25:37+5:30
१९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. तत्पूर्वी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी पोर्तुगालमध्ये नोंद झालेली आहे
पणजी : पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी असलेल्या गोवेकरांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल राज्यसभेत आवाज उठवला.
केवळ पोर्तुगालमधील जन्म नोंदणीवरुन भारतीय पासपोर्ट रद्द करणे अयोग्य असून तानावडे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने ७० हून अधिक लोकांचे पासपोर्ट रद्द केल्याने चिंता वाढली आहे. या व्यक्तींना पोर्तुगीज सरकारकडून अधिकृत नागरिकत्व दस्तऐवज मिळेपर्यंत भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला दिला आहे. तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवल्याने पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्यांचे आभार मानले असून तानावडे यांनी घेतलेल्या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले आहे.
याबाबतची पार्श्वभूमीची अशी आहे की, १९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. तत्पूर्वी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी पोर्तुगालमध्ये नोंद झालेली आहे. या नागरिकांना आता पासपोर्ट मिळवणे कष्टप्रद बनले आहे. पोर्तुगीज काळात जन्म नोंदणी असलेले आणि त्यानंतर पोर्तुगीज पासपोर्ट मिळवलेले अनेक राजकीय नेतेही निवडणूक लढविल्यानंतर गोत्यात आलेले आहेत. प्रकरणे कोर्टापर्यंत गेलेली आहेत