लाचखोरीसाठी पंचांचे टीमवर्क; एसीबीकडून आणखी एक पंचाला अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 08:00 PM2020-06-28T20:00:52+5:302020-06-28T20:01:04+5:30

वागातोर येथे होवू घातलेल्या एका रेस्टॉरन्ट प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी हे पंच सदस्य पैशांची मागणी करीत होते.

Teamwork of umpires for bribery; Another arbitral condition from the ACB | लाचखोरीसाठी पंचांचे टीमवर्क; एसीबीकडून आणखी एक पंचाला अट

लाचखोरीसाठी पंचांचे टीमवर्क; एसीबीकडून आणखी एक पंचाला अट

Next

पणजी: रेस्टॉरंटवाल्याकडे२० लाख रुपयांची मागणाºया हणजुणच्या हनुमंत  गोवेकर या हणजुणे येथील पंच सदस्याला भ्रष्टाचार विरोधी पथकाने अटक केल्यानंतर रविवारी आहेआणखी एक पंच  सदस्य सुरेंद्र गोवेकर याला अटक केली आहे तर तिसरी  एक पंच सदस्य शीतल दाबोलकर या बेपत्ता असून एसीबीपथक तिच्या शोधात आहे.

वागातोर येथे होवू घातलेल्या एका रेस्टॉरन्ट प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी हे पंच सदस्य पैशांची मागणी करीत होते. २० लाख रुपये रक्कम मागितली होती. त्यामुळे रेस्टॉरन्ट  प्रकल्पाच्या मालकाने याची माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली होती.  या प्रकरणात तक्रार नोंदवून घेऊन नियोजनबद्दरित्या सापळा रचून हनुमंतला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात एसीबी पथकाला यश मिळाले होते.

दरम्यान कोठडीतील चौकशी दरम्यान या लाचखोरी प्रकरणात आणखी दोन पंच सदस्यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने आणखी एक पंच सदसय सुरेंद्र गोवेकर याला एसीबीने अटक केली, परंतु तिसरी पंच सदस्य शीतल दाबोलकर  या सापडू शकल्या नाहीत अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली.

हनुमंत आणि सुरेंद्र यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या लाचखोरी प्रकरणात आणखीही भागिदार असण्याची शक्यता एसीबी नाकारीत नाही. हे नियोजनबद्द व टीमवर्कनेकरण्यात आलेली लाचखोरी असल्याचेही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तूर्त एसीबी  दाबोलकर यांच्या शोधात आहेत.

एका उद्योजकाला प्रकल्प सुरू करण्यासाठी संशयितांकडून २० लाख रुपये लाच मागण्यात आली होती. परंतु हा उद्योजक हुशार निघाला आणि त्याने एसीबीत तक्रार नोंदविली. तसेच त्या दरम्यान २० लाख रुपयांचे ९ लाखांवर आणण्यासाठी तक्रारदाराने तगादा लावला आणि त्यात यशही मिळविले. तसेच लाचेची रक्कम कमी करण्यात आल्यामुळेया प्रकरणात तक्रार वगैरे करण्यात आली असेल याचा संशयही पंच सदस्याला आली नाही. लाचेच्या रक्कमेचा पहिला हप्ता १ लाख रुपये स्विकारताना तो पकडला गेला.

Web Title: Teamwork of umpires for bribery; Another arbitral condition from the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.