शिरसई पंचायतीच्या प्रभाग ५वर तेजा कांदोळकर विजय

By काशिराम म्हांबरे | Published: January 29, 2024 10:37 AM2024-01-29T10:37:30+5:302024-01-29T10:37:53+5:30

ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या या प्रभागातून एकूण तीन उमेदवार रिंगणात उतरले होते.

Teja Kandolkar win on Ward 5 of Shirsai Panchayat | शिरसई पंचायतीच्या प्रभाग ५वर तेजा कांदोळकर विजय

शिरसई पंचायतीच्या प्रभाग ५वर तेजा कांदोळकर विजय

म्हापसा: बार्देश तालुक्यातील शिरसई पंचायत क्षेत्रातील प्रभाग ५ यात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत तेजा कांदोळकर निवडून आल्या आहेत. रिक्त झालेल्या या पंचायतीच्या प्रभागात काल रविवार २८ जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी तालुक्यातील मामलेदार कार्यालयात संपन्न झाली.

ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या या प्रभागातून एकूण तीन उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात झालेल्या एकूण मतदानातील तेजा कांदोळकर यांना १२३ मते प्राप्त झाल्याने त्या विजय ठरल्या आहेत.  पंचायतीच्या गत पंच सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्याने ही जागा रिक्त झाली होती. तालुक्यातील कळंगुट मतदार संघातल्या हडफडे - नागवा या पंचायतीच्या प्रभाग ४ यातील उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आला आहे.

Web Title: Teja Kandolkar win on Ward 5 of Shirsai Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा