तेजपालला न्यायालयाकडून दिलासा नाही, आरोपत्रप रद्द करण्याची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 06:26 PM2017-12-20T18:26:50+5:302017-12-20T18:27:22+5:30

पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या या आरोपी तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे तेजपालला खटल्यालास सामोरे जावे लागणार आहे. 

Tejpal does not get relief from court, dismiss plea dismisses petition | तेजपालला न्यायालयाकडून दिलासा नाही, आरोपत्रप रद्द करण्याची याचिका फेटाळली

तेजपालला न्यायालयाकडून दिलासा नाही, आरोपत्रप रद्द करण्याची याचिका फेटाळली

Next

पणजी -  पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या या आरोपी तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे तेजपालला खटल्यालास सामोरे जावे लागणार आहे. 
तेजपालच्या याचिकेवरील सनावणी १२ डिसेंबर रोजी पूर्ण झाली होती आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांनी निवाडा राखून ठेवला होता. बुधवारी हा निवाडा सुनावताना तेजपालच्या विरोधात कौल दिला. त्आरोपपत्र रद्द करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे त्यांच्या विरुद्धच खटला काही त्यांना चुकविता येणार नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना वेळ आहे. खंडपीठाच्या निवाड्या विरुद्ध ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे. 
युवतीवरील बलात्कार प्रकरणात आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे साफ खोटे असून ते रद्द करण्यात यावेत अशी याचिका तेजपाल याने खंडपीठात केली होती. म्हाप्सा विशेष न्यायालयात त्याच्या विरुद्ध आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर तेजपालने त्यांना खंडपीठात आव्हान दिले होते. तेजपालचे वकील अमर लेखी यांनी जुनेच युक्तिवाद करताना आरोप निराधार असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास करणाºया क्राईम ब्रँचकडून सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेली नाही. तसेच इतर माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. तेजपाल त्या युवतीवर आगळीक करीत असल्याचे कुठेच कँमºयातही टीपले गेलेले नाही. त्यामुळे हे आरोप रद्दबातल ठरवावेत अशी मागणी त्यांनी केली. 
क्राईम ब्रँचचे वकील सरेश लोटलीकर यांनी तेजपालची ही याचिका म्हणजे वेळकाढू धोरण असल्याचे सांगितले होते. क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात तेजपालविरुद्ध सर्व पुरावे मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले होते.  दरम्यान तेजपाल प्रकरणात म्हापसा न्यायालयात ९ जानेवारीपासून खटला सुरू होणार होता.

Web Title: Tejpal does not get relief from court, dismiss plea dismisses petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.