उत्पलला सांगा, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भेट! बाबूश मोन्सेरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 08:32 AM2024-01-11T08:32:18+5:302024-01-11T08:33:00+5:30
'स्मार्ट सिटी'चे काम योग्य दिशेने.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीवरून आपल्यावर टीका करणाऱ्या उत्पल पर्रीकर यांच्यासारख्यांना उत्तर देण्यास आपण बांधील नाही. स्वतःचे शून्य कर्तृत्व असणाऱ्यांनी इतरांच्या जीवावर उड्या न मारता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याविरोधात लढावे, असे खुले आव्हान पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल दिले आहे.
नववर्षाच्या पहाटे मळा-पणजी येथील स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात पडून एका तरुणाचा जीव गेला. त्यानंतर या कामांवर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. यात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल यांनीही उडी घेत पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना टार्गेट करत यांच्यावर जहरी टीका केली. त्यावर काल बाबूश यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
मंत्री मोन्सेरात म्हणाले, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना काही प्रमाणात त्रास होत आहे, आहे, हे हे मान्य: मान्य आहे. मलाही तो त्रास होत आहे; मात्र आम्ही नुसते गप्प बसलो नसून स्मार्ट सिटीची जी प्रलंबित काम आहेत ती पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीतील लोकांना सध्या मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच याच खोदकामामुळे छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत आहेत. मार्च २०२४ पर्यंत स्मार्ट सिटीचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, या कामाचे एकूण बजेट १ हजार कोटी रुपये इतके आहे.
औषध योग्य ठिकाणी लागले
जिथे औषध लागायचे होते तिथे ते व्यवस्थित लागले आहे. औषध जर सारखे असेल तर ते समोरच्याला झोंबणार व त्याचा त्याचा त्रास होणारच, असा खोचक टोला मंत्री मोन्सेरात यांच्या टीकेनंतर उत्पल पर्रीकर यांनी लगावला आहे.
टॉम डिक अॅण्ड हॅरी...
काहीजण प्रकल्पाच्या कामावरून आपल्यावर टीका करत आहेत. या टीकेने आपल्यावर कोणताही फरक पडत नाही. लोकांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. स्मार्ट सिटीवरून टीका करणाऱ्या 'टॉम डिक अॅण्ड हॅरी' यांना उत्तर देण्यास आपण बांधील नाही. त्यांच्यात एवढी धमक असेल तर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याला भेटावे, असे खुले आव्हानही दिले आहे.