काणका-म्हापसा येथे मंदिर फोडले
By admin | Published: March 13, 2015 12:52 AM2015-03-13T00:52:49+5:302015-03-13T00:54:47+5:30
बार्देस : काणका-म्हापसा येथील श्री विश्वटी विश्वेश्वर शिवशंकर मंदिरात गुरुवार, १२ रोजी रात्री अडीचच्या सुमारास झालेल्या चोरीत
बार्देस : काणका-म्हापसा येथील श्री विश्वटी विश्वेश्वर शिवशंकर मंदिरात गुरुवार, १२ रोजी रात्री अडीचच्या सुमारास झालेल्या चोरीत सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराच्या मागीलदाराची कडी आणि लोखंडी ग्रिल्सचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मौल्यवान वस्तू व इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. चार फंडपेट्या फोडून रोकड लंपास केली.
चोरट्यांनी आतील एक कपाट फोडले. त्यातील पालखीचे चांदीचे गोंडे घेतले आणि अन्य साहित्य अस्ताव्यस्त टाकले. त्यानंतर बाहेरील सभामंडपाच्या बाजूस असलेल्या मंदिराच्या बाजूच्या दोन्ही खोल्यांची कुलपे तोडली. त्यातील एका खोलीत दोन कपाटे होती. ती फोडून साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले. दुसऱ्या बाजूच्या खोलीचेही कुलूप तोडले, त्यातही त्यांना काही सापडले नाही. मंदिरात गर्भकुडीच्या बाहेर मोठी एक, त्याच्याच बाजूला लहान एक, तर बाहेरच्या बाजूला दोन अशा एकूण चार फंडपेट्या आहेत. या चारही पेट्या फोडल्या. मंदिरातील पालखीतील चांदीचे गोंडे, तीन कपाटे फोडून टाकली. मंदिराच्या मालमत्तेची मोडतोड आणि नासधूसही केली. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर व पोलीस शिपाई रामा मातोंडकर यांनी पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी पाहणी केली.
(प्रतिनिधी)