गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-याला दहा हजार रुपयांचा दंड

By admin | Published: August 8, 2016 04:19 PM2016-08-08T16:19:40+5:302016-08-08T16:19:40+5:30

गोव्यात आता मद्यपान करणे पर्यटकांना चांगलेच महागात पडणार आहे. गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Ten thousand rupees penalty for public drinking in public in Goa | गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-याला दहा हजार रुपयांचा दंड

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-याला दहा हजार रुपयांचा दंड

Next

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 8 - गोव्यात आता मद्यपान करणे पर्यटकांना चांगलेच महागात पडणार आहे. गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा विधानसभेत नवीन दुरुस्ती करण्यात आलेला राज्य उत्पादन शुल्क कायदा मांडण्यात आला. या कायद्यानुसार गोव्यात ठिकठिकाणी मद्यपान निषेध असलेले फलक लावण्यात येणार आहेत.  फलक लावलेल्या परिसरात जर कोणी मद्यपान करताना आढळल्यास त्या मद्यपीला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
गोव्यात येणा-या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारे आणि रस्त्यांवर मद्यपान करण्याच्या अनेक तक्रारी पाहता गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Ten thousand rupees penalty for public drinking in public in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.