कर्नाटकातून गोव्यात दहा टन बीफ आयात, कत्तलखाना एक आठवडय़ानंतर सुरू होणार !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:14 PM2018-01-10T23:14:44+5:302018-01-10T23:15:05+5:30
पणजी - गोव्यातील अखिल गोवा कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने संप मागे घेतल्यानंतर बुधवारी राज्यात दहा टन बीफ आयात झाले. दरम्यान, संघटनेने सचिवालयात पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांची भेट घेऊन उसगावचा कत्तलखाना तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली.
संप मागे घेतल्याने आणि कर्नाटकातील वितरकांना हमी मिळाल्याने गोव्यात बीफ येण्यास सुरुवात झाली. आज दहा टन बीफ गोव्यात आयात झाले असून, विक्रेत्यांकडे पाच टन, हॉटेल व तत्सम उद्योगांसाठी पाच टन असे बीफ गोव्यात आयात झाले. राज्याच्या सीमेवर अनमोड आणि केरी या तपासणी नाक्यावर पोलिसांनी आलेल्या सूचनेनुसार कागदपत्रंची पाहणी करून बीफ घेऊन येणा:या वाहनांना प्रवेश दिला. त्यामुळे आज कोठेही वाहने अडविण्यात आली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, मंत्री गुदिन्हो यांची संघटनेच्या पदाधिका:यांनी भेट घेतल्यानंतर गुदिन्हो यांनी कत्तलखान्याच्या अधिका:यांशी चर्चा केली. यावेळी तो कारखाना कार्यान्वित करण्यासाठी एका आठवडय़ाचा अवधी द्यावा, असे त्यांना सांगण्यात आले. कारण दोन महिने कारखाना बंद असल्याने काही उपकरणांचा बदल करणो गरजेचे आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर येथे कर्नाटकातून गुरे आणली जातील आणि लोकांना ताजे बीफ मिळेल, असे संघटनेच्या पदाधिका:यांचे म्हणणो आहे. यावेळी संघटनेने कर्नाटकातून गुरे वाहतुकीचा नुतनीकरण केलेला परवानाही गुदिन्हो यांना दाखविला. याशिवाय चार दिवस दुकाने बंद झाल्याने या व्यवसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागल्याचेही संघटनेने मंत्र्यांना सांगितले.