म्हापशात पोलिसांची भाडेकरू तपासणी मोहिम
By काशिराम म्हांबरे | Published: April 14, 2023 06:29 PM2023-04-14T18:29:42+5:302023-04-14T18:29:55+5:30
सीआरपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
काशीराम म्हाबरे
म्हापसा: दोन दिवसापूर्वी कोलवाळ पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आल्यानंतर म्हापसा पोलिसांकडूनही भाडेकरुंची तपासणी करणारी मोहिम हाती घेण्यात आली.
उपअधिक्षक जिवबा दळवी निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या मोहिमेत उपनिरीक्षक सुनील पाटील तसेच इतर पोलिसांनी भाग घेतला. खोर्लीपरिसर, गंगानगर, एकतानगर, घाटेश्वरनगर, तसेच डोंगराळ भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची यावेळी तपासणी करण्यात आली.
या मोहिमे दरम्यान पोलिसांनी ५० लोकांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळपासून ही मोहिम सुरु करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांकडेआवश्यक कागदपत्रे नसताना गोव्यात वास्तव करून रहात असल्याचेही आढळून आले. त्यांच्या विरोधात सीआरपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
शहरातील इतरही भागात अशा प्रकारची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आल्याची ते म्हणाले.