नव्या बोरी व बाणस्तारी पुलासाठी ऑक्टोबरमध्ये निविदा, जागा निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 09:48 PM2018-05-23T21:48:21+5:302018-05-23T21:48:21+5:30
सरकारने साधनसुविधा विषयक प्रकल्प उभे करण्याचा धडाका लावला असून नव्या बोरी आणि बाणस्तारी या दोन पुलांच्या कामासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये निविदा जारी केली जाणार आहे.
पणजी - सरकारने साधनसुविधा विषयक प्रकल्प उभे करण्याचा धडाका लावला असून नव्या बोरी आणि बाणस्तारी या दोन पुलांच्या कामासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये निविदा जारी केली जाणार आहे. त्यासाठी जागा निश्चित झाली आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे जाहीर केले. खांडेपार पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या दि. 15 जूनर्पयत त्याच्या एका पदराचे उद्घाटन केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
भारतातील दुस-या क्रमांकाचा सर्वात लांब केबल स्टेड पुल जुवारीवर उभा राहत असून त्या पुलाचे 3क् टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाल्याचेही ढवळीकर म्हणाले. मंत्री ढवळीकर यांनी पत्रकारांना सोबत घेऊन बुधवारी सायंकाळी जुवारी पुलाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. वेर्णापासून आगशी व बांबोळीर्पयत रस्त्यांचे रुंदीकरण व जुवारी नदीवर आठपदरी पुल असे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एकूण तीन हजार तीनशे कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे. जुवारी पुल येत्यावर्षी म्हणजे डिसेंबर 2क्19 मध्ये पूर्ण होईल. मंत्री ढवळीकर म्हणाले, की 2क्16 साली आम्ही जी मोठी कामे सुरू केली, ती 9क् टक्के पूर्ण झाली आहेत. जुवारी पुलाचे कामही निर्धारित वेळेत पूर्ण होईल. फक्त पुलावरील ऑब्जरवेटरीआणि अन्य छोटय़ा कामांसाठी आणखी सहा महिने लागतील. खर्चही थोडा वाढेल. कारण जुवारी पुलाचे खांबे उभे करण्यासाठी पाण्याखाली साठ मीटर खोदावे लागले. त्यानंतरच तळाला पाषाण लागले.
बोरी पुलाला समांतर असा नवा सहापदरी पुल बांधला जाईल. बाणस्तारी व बोरी या दोन्ही पुलांसाठी निविदा याच वर्षी ऑक्टोबरमध्ये जारी करून काम सुरू केले जाईल. जुवारीचा पुल हा आठपदरी असेल. एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा जुवारी पुल आहे. या पुलाच्या मधल्या दोन खांबांमध्ये 36क् मीटरचे अंतर आहे आणि दोन्ही बाजूंनी 14क् मीटरचे अंतर आहे. भारतात प्रथमच राबोटीक वेल्डींग म्हणजेच मनुष्यबळ न वापरता स्वयंचलित पद्धतीने वेल्डींग करण्याचे काम जुवारी पुलासाठी केले जात आहे. या पुलाच्या खांबावर अगदी वरच्या बाजूला जी हवामान खात्याची ऑब्जरवेटरी असेल तिथे जाण्यासाठी लिफ्ट असेल, असे मंत्री ढवळीकर यांनी नमूद केले.
वैशिष्टय़े जुवारी पुलाची
- भारतातील दुस:या क्रमांकाचा सर्वात जास्त लांबीचा जुवारी हा केबल स्टेड पुल
- पुलाचे खांब उभे करण्यासाठी पाण्याखाली 4क् मीटर खोदावे लागेल असे वाटले होते पण प्रत्यक्षात 6क् ते 7क् मीटर खोदावे लागले
- पुलाच्या खांबाच्या वरच्या टोकावर हवामान खात्याची ऑब्जरवेटरी. तिथे जाण्यासाठी लिफ्टची सोय
- पुलाचे काम डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण होणार. एकूण खर्च 3 हजार 30 कोटी रुपये
- पुलाच्या कामासाठी मनुष्यबळ न वापरता स्वयंचलित पद्धतीने रोबोटिक वेल्डींगचे काम. भारतात अशी पद्धत प्रथमच आता गोव्यात वापरली जात आहे
- जुवारी पुल आठपदरी व त्यासाठीच्या जोडरस्त्यांची कामेही युद्धपातळीवर सुरू. रस्ते रुंदीकरणाची काही कामे पूर्णत्वास