माजी नगराध्यक्षांची लागणार कसोटी, प्रतिष्ठा पणाला; फोंडा पालिका निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 01:33 PM2023-04-29T13:33:44+5:302023-04-29T13:34:46+5:30

नगरपालिका निवडणुकीत यावेळी आठ माजी नगराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

test of former mayor reputation stake whose side will the voters vote for in the Ponda municipal elections | माजी नगराध्यक्षांची लागणार कसोटी, प्रतिष्ठा पणाला; फोंडा पालिका निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने?

माजी नगराध्यक्षांची लागणार कसोटी, प्रतिष्ठा पणाला; फोंडा पालिका निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने?

googlenewsNext

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क: नगरपालिका निवडणुकीत यावेळी आठ माजी नगराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यातील सहा नगराध्यक्ष मागच्या कार्यकाळात नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेले होते.

शैलेंद्र शिंक्रे व किशोर नाईक हे पूर्वी नगराध्यक्ष होते. यावेळेस प्रभाग ४ मधून माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक हे आपल्या पारंपरिक प्रभागात उभे असून, सध्या तरी भाजपचे संदीप आमोणकर हे त्यांना टक्कर देत आहेत. उर्वरित तीन उमेदवारांचा अजून तरी तेवढा प्रभाव पडलेला दिसत नाही. फोंडा शहरात कचरा विल्हेवाटीसाठी व्यंकटेश नाईक यांनी जे काम केले आहे ते लोकांच्या चांगलेच स्मरणात आहे. त्यामुळेच लोक त्यांना प्रत्येकवेळी निवडून देत आले आहेत.

प्रभाग ५ मधून रितेश नाईक हे भाजप तर्फे उभे आहेत. तसे पाहायला गेल्यास अजूनही ते नगराध्यक्ष आहेत. यावेळी मगोचे सुशांत कवळेकर त्यांना कडवी लढत देत आहेत. रितेश नाईक यांचा विजय एरवी सुकर झाला असता, परंतु त्यांच्याच नातेवाइकांपैकी एक असलेले श्रावण नाईक यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना विजयासाठी जंग जंग पछाडावे लागत आहे. क्रमांक ७ मधून माजी नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून आल्याने त्यांनी आपले वजन पालिका क्षेत्रात सिद्ध केले आहे.

त्याचबरोबर ते आपल्या प्रभागात किती लोकप्रिय आहेत हेसुद्धा सिद्ध झाले आहे. प्रभाग ८ मध्ये माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक हे आरक्षणामुळे उभे राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी आपल्या कन्येला येथे उभे केले आहे. आजच्या घडीचा कानोसा घेतला असता सध्या प्रदीप नाईक हे तसे आघाडीवर असल्याचे जाणवत आहे. भाजप व गीताली तळावलीकर काँग्रेसचे उमेदवार येथे आहेत; परंतु प्रदीप नाईक यांचा तळागाळातील लोकांपर्यंत संपर्क असल्याने सध्या तरी त्यांचे पारडे जड आहे. प्रभाग १० मध्येसुद्धा प्रभाग आरक्षण झाल्याने माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी आपली पत्नी दीपा कोलवेकर यांना पुढे केले आहे. इथे मगो व भाजपमध्ये चुरशीची लढत होत आहे.

प्रभाग १५ मध्ये गीताली तळावलीकर या मागच्या कार्यकाळात नगराध्यक्ष होत्या. त्यांची टक्कर यावेळी माजी नगराध्यक्षांच्या कन्येशी होत आहे. किशोर नाईक यांचा मागच्या वेळी गीताली तळावलीकर यांनी पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी यावेळी व्यूहरचना केली आहे.

- २०१८ ते २०२३ या कार्यकाळात फोंडा नगरपालिकेने पाच नगराध्यक्ष पाहिले. ते सर्व नगराध्यक्ष यावेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत.

- यापैकी पुढच्या कार्यकाळासाठी कोण निवडून येतो याची चावी तूर्तास तरी मतदारांकडे आहे. यावेळी नगराध्यक्ष पद हे खुले आहे. त्यामुळेच निवडणुकीची सेमी फायनल पार करण्यासाठी पाचही जणांनी आपले कसब पणास लावले आहे. प्रत्येक माजी नगराध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात काही महत्त्वाच्या कामांना चालना दिली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: test of former mayor reputation stake whose side will the voters vote for in the Ponda municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.