गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी किंवा होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 07:47 PM2020-05-23T19:47:50+5:302020-05-23T19:48:13+5:30
विमानातून येणाऱ्यांना गोव्यात कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे ट्वीट आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी केले होते. मात्र, तसा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही
पणजी : गोव्यात येत्या सोमवारपासून विमाने व नव्या रेलगाडय़ाही सुरू होत आहेत. त्यामुळे गोवा सरकारने पूर्ण नवी प्रक्रिया तयार केली आहे. नव्या प्रक्रियेनुसार गोव्यात येणा:या प्रत्येकाला कोविद चाचणीला किंवा चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनला सामोरे जावे लागेल. विमाने, रेल्वे किंवा रस्ता मार्गे जे प्रवासी येतील, त्या सर्वाना समान प्रक्रिया लागू होईल. सर्वाना कोरोना चाचणी किंवा घरी निगराणीखाली चौदा दिवस राहणो असे दोन पर्याय दिले जाणार आहेत. ही माहिती सरकारच्या आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन आयएएस यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
विमानातून येणाऱ्यांना गोव्यात कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे ट्वीट आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी केले होते. मात्र, तसा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही, असे श्रीमती मोहनन यांनी व्यक्त केला. जे गोमंतकीय खलाशी विदेशात अडकले आहेत किंवा जे विदेशस्थित गोमंतकीय कोरोना काळामुळे अडकले व आता गोव्यात येतील त्यांच्यासाठी ही नवी प्रक्रिया लागू होणार नाही. इतरांना कोविड चाचणी करून घेताना दोन हजार रुपयांचे शूल्क मोजावे लागेल, असे श्रीमती मोहनन यांनी सांगितले. गोव्यात कोरोनाचा एकच नवा पॉझिटीव्ह रुग्ण शनिवारी सापडला. तोही मुंबईहून रस्ता मार्गे गोव्यात आला होता. एकूण 39 कोविड पॉझिटीव्ह रुग्ण आता गोव्यात आहेत. रेल्वेतून काहीजण शनिवारी गोव्यात आले, त्यांची चाचणी सुरू आहे. गोवा अजुनही ग्रीन झोनमध्येच आहे असेही मोहनन यांनी नमूद केले.