ती अपहृत अल्पवयीन शेवटी मुंबईत मामाचा घरी सापडली
By सूरज.नाईकपवार | Updated: December 25, 2023 11:49 IST2023-12-25T11:49:26+5:302023-12-25T11:49:51+5:30
२२ डिसेंबरला वरील घटना घडली होती. तीच्या वडिलाने यासंबधी पोलिसांत रितसर लेखी तक्रार करताना अज्ञाताने आपल्या मुलीला पळवून नेल्याचे म्हटले होते.

ती अपहृत अल्पवयीन शेवटी मुंबईत मामाचा घरी सापडली
लोकमत न्युजनेटवर्क
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा येथील फातोर्डा भागातून अपहरण झालेली ती अल्पवयीन मुलगी शेवटी मंबुई येथे आपल्या मामाच्या घरी सापडली. एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार येथील फातोर्डा पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.
२२ डिसेंबरला वरील घटना घडली होती. तीच्या वडिलाने यासंबधी पोलिसांत रितसर लेखी तक्रार करताना अज्ञाताने आपल्या मुलीला पळवून नेल्याचे म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी भादंसंच्या ३६३ कलमाखाली वरील प्रकरण नोंदवून घेतले होते व तपासकामाला सुरुवात केली होती.
त्यामुलीने घरातून निघून जाताना चिठ्ठी लिहून ठेवली हाेती. त्यात आपण घर सोडून का जाते याचाही उल्लेख केला होता. मुंबईला मामाच्या घरी पोहचल्यानंतर तिने घरच्या मंडळीकडे आपण मुंबईत असल्याचे सांगितले, त्यानतंर तिचा शोधात असलेल्या तीच्या पालकांनीही सुटकेचा श्वास सोडला. नंतर यासंबधी पाेलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांनी या माहितीची खातरजमा करुन घेतली. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत.