द बर्निंग कार: वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकीला आगीने घेतला पेट
By पंकज शेट्ये | Published: December 9, 2023 09:50 PM2023-12-09T21:50:47+5:302023-12-09T21:51:35+5:30
वेळेवरच चालक बाहेर निघाल्याने बचावला
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: गॅरेजीत दुरूस्तीसाठी (सर्व्हीसिंग) आलेली चारचाकी मॅकानीत वेर्णा महामार्गावर तपासणीसाठी घेऊन जाताना अचानक चारचाकीला आगीने पेट घेतला. आगीने पेट घेतल्याचे चारचाकी चालवणाऱ्या मॅकानिकला समजताच त्यांने त्वरित चारचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून तो चारचाकीतून बाहेर निघाल्याने सुखरूप बचावला. नंतर त्या चारचाकीला आगीने भयंकर पेट घेऊन त्यात ती जळून खाक झाले.
वेर्णा अग्निशामक दलातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.९) दुपारी १.२० च्या सुमारास ती घटना घडली. वेर्णा महामार्गाच्या बाजूला एक चारचाकी दुरूस्त करणारी गॅरेज आहे. त्या गॅरेजीत एके महीलेने तिची चारचाकी दुरूस्त (सर्व्हीसींग) करण्यासाठी दिली होती. शनिवारी दुपारी १ वाजता त्या गॅरेजीतील एक मॅकानिक चारचाकी तपासण्यासाठी वेर्णा महामार्गावरून चालवून घेऊन जात होता. वेर्णा महामार्गावरून चारचाकी घेऊन जाताना मॅकानिकला चारचाकीत आग लागल्याची जाणीव झाली. त्यांने त्वरित चारचाकी महामार्गाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर उभी करून स्व:ताचा जीव वाचवण्यासाठी तो त्वरित चारचाकीतून बाहेर निघाला. मॅकानिक चारचाकीतून बाहेर निघाल्यानंतर थोड्या क्षणातच चारचाकीला आगीने भयंकर पेट घेतला.
वेर्णा अग्निशामक दलाला घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित दाखल होऊन आगीत जळणाऱ्या चारचाकीवर पाण्याचे फव्वारे मारायला सुरवात केली. अग्निशामक दलाने चारचाकीवर पाण्याचे फव्वारे मारायला सुरवात केल्यानंतर थोड्या मिनिटातच त्यांना आगीवर नियंत्रण आणण्यास यश प्राप्त झाले. वेर्णा पोलीसांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. आगीच्या घटनेत चारचाकी जळून खाक झाली, मात्र सुदैवाने त्यात कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही.