राज्यात २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान शिगमोत्सवचा जल्लोष
By समीर नाईक | Published: March 22, 2024 04:20 PM2024-03-22T16:20:58+5:302024-03-22T16:21:21+5:30
शिगमोत्सव परेड मध्ये रोमटामेळ, घोडेमोडनी, धनगर नृत्य, गोफ, मोरुलो, या सारख्या राज्यातील पारंपरिक गोष्टींचा समावेश असणार आहे.
पणजी: शिगमोत्सवाचा वार्षिक सोहळा दि. २६ मार्च ते ८ एप्रिल २०२४ या दरम्यान होणार आहे. या कालावधीत अनुक्रमे फोंडा, कळंगुट, सांखळी, वाळपई, पर्वरी, डिचोली, काणकोण, पेडणे, वास्को, शिरोडा, कुडचडे, केपे, धारबांदोडा, मडगाव, म्हापसा, सांगे आणि कुंकळी येथे शिगमोत्सव चित्ररथ परेड असणार आहे.
शिगमोत्सव परेड मध्ये रोमटामेळ, घोडेमोडनी, धनगर नृत्य, गोफ, मोरुलो, या सारख्या राज्यातील पारंपरिक गोष्टींचा समावेश असणार आहे. तसेच प्रकाश आणि ध्वनीचा वापर करत राक्षसांविरूद्ध देवांच्या विजयी लढायांच्या मनोरंजनासह रामायण आणि महाभारतापासून प्रेरित पौराणिक दृश्यांवर आधारित या शोभायात्रा सजलेल्या असतात.
शिगमोत्सव परेड मध्ये विविध सांस्कृतिक संघ आपल्या भागातील परंपरा खास वेशभूषा आणि ढोल ताश्यांच्या गजरात लोकांना त्यांच्या तालावर थिरकण्यास भाग पाडतात.
शिगमोत्सवाचा प्रत्येक घटक गोव्याच्या जीवनाची आणि परंपरांची झलक देतो.
शिगमोस्तव परेडचे वेळापत्रक खालील प्रमाणे:
फोंडा - २६ मार्च
कळंगुट - २७ मार्च
सांखळी - २८ मार्च
डिचोली - २९ मार्च
पणजी - ३० मार्च
पर्वरी - ३१ मार्च
पेडणे - १ एप्रिल
काणकोण - २ एप्रिल
वास्को - ३ एप्रिल २
शिरोडा व कुडचडे- ४ एप्रिल
केपे व धारबांदोडा - ५ एप्रिल
मडगाव - ६ एप्रिल
म्हापसा व सांगे - ७ एप्रिल
कुंकळी व वाळपई - ८ एप्रिल