कामकाज सल्लागार समितीला विश्वासात न घेताच अधिवेशनाचा कालावधी ठरविला
By किशोर कुबल | Published: January 2, 2024 01:49 PM2024-01-02T13:49:24+5:302024-01-02T13:49:35+5:30
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचा आरोप
पणजी : कामकाज सल्लागार समितीला विश्वासात न घेताच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जाहीर करण्यात आल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी आक्षेप घेतला आहे.
युरी म्हणाले की,‘ सहा दिवसांचे कामकाज ठरवले कोणी, हे स्पष्ट व्हायला हवे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर असे नमूद केले होते की कामकािज सल्लाकार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे दिवस ठरवले जातील. परंतु समितीला विश्वासात घेतलेच नाही. २ ते ९ फेब्रुवारी हा कालावधी आम्हाला अंधारात ठेवून निश्चित केला.’
युरी पुढे म्हणाले की,‘ विधिमंडळ सचिवांनी विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाच्या दिवसांसाठी जारी केलेल्या बुलेटिनने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मुख्यमंत्र्यांच्या घोषणा गांभीर्याने घेतल्या जात नाही.’ ही विधानसभा कामकाज सल्लागार समिती नसून भाजप सल्लागार समिती असल्याची टीकाही युरी यांनी केली आहे.