श्री मारुतीराय संस्थानच्या जत्रोत्सवाला सुरुवात, भाविकांनी केली गर्दी
By समीर नाईक | Published: February 18, 2024 01:55 PM2024-02-18T13:55:37+5:302024-02-18T13:56:03+5:30
पहाटे ५ वा.अभिषेक व मुख्य धार्मिक विधिना सुरूवात झाली आहे.
पणजी: पणजीवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मारुतीगढ, मळा, पणजी येथील प्रसिद्ध श्री मारुतीराय संस्थानचा ९३ व्या जत्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली.
पहाटे ५ वा.अभिषेक व मुख्य धार्मिक विधिना सुरूवात झाली आहे. दुपारपर्यंत पुण्यवाहक, समग्रमुख हनुमान मूलमंत्र जपयाग, महाआरत्या व तीर्थप्रसाद अशा विधी पार पडल्या. तसेच मारुतीरायाची पालखीतून भव्य मिरवणूक रविवारी काढली जाते, ती सोमवारी पहाटे ही पालखी देवळात पोहचते.
भाविकांनी पहाटेपासूनच श्री मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. राज्यभरातून लोक श्री मारुतीरायाचा दर्शनाला येथे येत असतात. अनेक लोक तर आपल्या इच्छा, किंवा नवस फेडण्यास उघड्या पायांनी चालत मारुतीरायाच्या दर्शनासाठी येत असतात. जत्रोत्सव निमित्त सुमारे ८ दिवस येथे फेरी भरत असते. तसेच या दरम्यान विविध धार्मिक व संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते.