वीज विक्रीव्दारे सरकारने कमावला ९२५ कोटी रुपयांचा नफा
By पूजा प्रभूगावकर | Updated: July 16, 2024 14:14 IST2024-07-16T14:14:19+5:302024-07-16T14:14:55+5:30
गोव्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यादृष्टीने सरकार ठोस पावले उचलत आहे.

वीज विक्रीव्दारे सरकारने कमावला ९२५ कोटी रुपयांचा नफा
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा
गोवा सरकारने मागील चार वर्षात वीज विक्रीव्दारे ९२५ कोटी रुपयांचा नफा कमावला असल्याचे लेखी उत्तर वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी विधानसभेत दिले आहे. राज्यात वीजेची गरज लक्षात घेता सरकारने २०२० ते मार्च २०२४ या चार वर्षात विविध माध्यमातून सुमारे ८ हजार १६ कोटी रुपये खर्च करुन वीज खरेदी केली. तर या कालावधीत विजेची विक्रीही सरकारने केली आहे. मागील चार वर्षात सरकारने वीज विक्रीव्दारे ८ हजार ९४१ कोटी रुपये कमावल्याचेही मंत्री ढवळीकर यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
वीज विक्रीव्दारे सरकारने २०२० ते २०२४ या काळात ९२५ कोटी रुपयांचा नफा कमावला. यामुळे सरकारच्या महसूलात वृध्दी झाली आहे. याशिवाय गोव्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यादृष्टीने सरकार ठोस पावले उचलत आहे. त्यानुसार जुन्या वीज केबल्स बदलणे, नवे ट्रान्फॉर्मर बसवणे, वीज सबस्टेशनमध्ये सुधारणा करणे आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.